लैंगिक अत्याचार करणारा व बलात्काऱ्याला फाशीची शिक्षेची मुस्लिम संघटनेचे मागणी
मुस्लिम संघटनेतर्फे अंध महिलेवर अत्याचार करणारा, तसेच बार्शीटाकळी येथील जिल्हा परिषद शाळेतील दोन शिक्षकांनी चौथ्या वर्गातील चार मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी निवेदनातून केली आहे.
संपूर्ण बातमी पाहण्यासाठी येथे 👆 स्पर्श करा
अकोल्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडलीये. बस स्थानकावर पत्ता विचारणाऱ्या अंध महिलेवर तिच्या अंध पतीसमोरच लैंगिक अत्याचार करण्यात आला. अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलिसांनी याप्रकरणी आरोपी गुलाम रसुल शेख मतीनला अटक केलीये. याप्रकरणी आरोपीला पुढील दोन दिवस कोठडी न्यायालयाने सुनावली असली तरी आरोपीवर कडक कारवाई करून फाशीची शिक्षा देण्यात यावी. तसेच गुरूला सर्वश्रेष्ठ मानणारी आपल्या देशातील संस्कृती. पण या संस्कृतीला काही शिक्षकच काळिमा फासत असल्याचं अकोला जिल्ह्यात उघड झालं आहे.
जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात धामणदारी इथे जिल्हा परिषद शाळेत शिकत असलेल्या चौथ्या वर्गातील चार विद्यार्थीनी (मुली) वर लैंगिक अत्याचाराच्या बळी पडल्यात. याच शाळेतील २ शिक्षक राजेश तायडे व सुधाकर ढगे यांच्यावर चारही विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असून या प्रकरणात त्यांच्यावर बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन शिक्षकांसह अंध महिलेवर बलात्कार करणाऱ्या वर कडक कारवाई करून फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी. जेणेकरून भविष्यात अशा प्रकारचे कृत्य कोणीही करणार नाही. असे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना निवेदनातून मुस्लिम संघटनेतर्फे करण्यात आली. यावेळी मुस्लिम संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या