Ticker

6/recent/ticker-posts

पोलीस कर्मचारी विलास पवार यांनी वाचविले प्रवाशाचे प्राण

पोलीस कर्मचारी विलास पवार यांनी वाचविले प्रवाशाचे प्राण


सोमवारी रात्री 9.30 वाजताचे सुमारास विदर्भ एक्सप्रेस अकोला रेल्वे स्टेशन येथून रवाना होत असताना एक इसम ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होता. ट्रेनमध्ये चढताना त्याचा तोल जाऊन तो प्लॅटफॉर्म व ट्रेनमधील गॅपमध्ये पडत असताना, त्या ठिकाणी ड्युटीवर असलेले रेल्वे पोलीस विलास पवार यांनी प्रसंगावधान दाखवून स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या व्यक्तीला प्लॅटफॉर्मवर खेचून घेऊन त्याचा जिव वाचवला. या पोलीस कर्मचाऱ्याने यापूर्वीही 2 दोन वेळा असेच प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या