Ticker

6/recent/ticker-posts

ठाकरे-आंबेडकर युतीवर सुषमा अंधारेंचे मोठे विधान

ठाकरे-आंबेडकर युतीवर सुषमा अंधारेंचे मोठे विधान


शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा आज करण्यात आली. गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे आणि आंबेडकर एकत्र येणार असल्याची चर्चा होती, युतीच्या घोषणेने आता शिवशक्ती-भिमशक्ती एकत्र येणार आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी वंचितसोबतच्या युतीवर भाष्य केलं आहे. 
“आमच्या पक्ष नेतूत्वाने सर्व अशक्य आणि बाजूंचा विचार करून हा निणर्य घेतला आहे. त्यामुळे पक्ष नेतुत्वाचा आदेश आमच्यासाठी महत्वाचा आहे. यामुळे चांगले पर्व सुरु झालं असून लवकरच असे अनेक पक्ष भाजपच्या मुजोरशाही विरोधात एकत्र येतील”, असं सुषमा अंधारे यांनी सांगितलं आहे



महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या