वंचित बहुजन आघाडीचे नेत्र तपासणी शिबिर संपन्न
अकोला दिनांक। रोजी वंचित बहुजन युवक आघाडीचा व वंचित बहुजन आघाडी अकोला पश्चिम च्या वतीने प्रभाग क्रमांक 18 अकोली खुर्द येथे कलर टायपिंग इन्स्टिट्यूट (कलर कॉम्प्लेक्स )जिल्हा परिषद शाळेजवळ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भव्य नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये परिसरातील नागरिकांचे मोफत नेत्र तपासणी तसेच अल्पशा दरामध्ये चष्म्यांचे वाटप करण्यात आले. या शिबिराच्या आयोजन वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आयु, सुरेश कलोरे यांनी केले होते ,या शिबिराच्या यशस्वीतेसाठी वंचित बहुजन युवा आघाडीचे अक्षय भाऊ गोपनारायण यांनी परिश्रम घेऊन नागरिकांपर्यंत या शिबिराची माहिती पोहोचवली सदर व जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचे लाभ घ्यावा असा आव्हान केले. शिबिरामध्ये डॉक्टर सुरेश मोरखडे,व भारती डोहाळे, यांनी नागरिकांना तपासून योग्य सल्ला व मार्गदर्शन केले .या शिबिरामध्ये परिसरातील शोभाताई कलोरे मीराताई मसने ,सचिन ठाकूर ,राम ठाकूर ,नारायण रोहनकर ,गोपाल कलोरे, दिलीप पाचोरे ,आशाबाई गोपनारायण, गीताबाई वानखडे, कमलाबाई खंडारे, कापुरा गोपनारायण, यांच्यासह परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते. व असंख्य नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. या शिबिराच्या यशस्वी ते करिता वंचित बहुजन युवा आघाडीचे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी परिश्रम केले.
0 टिप्पण्या