Ticker

6/recent/ticker-posts

शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला येथे फटाके फोड़नारे मॉडिफाइड साइलेंसर रोड रोलर द्वारे नष्ट

शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला येथे फटाके फोड़नारे मॉडिफाइड साइलेंसर रोड रोलर द्वारे नष्ट


      शहरातील सायलेन्सरव्दारे फटाके फोडणा-या बुलेट वाहन तसेच विनापरवानगी वाहनात बदल करणाऱ्या मोडिफिकेशन करणाऱ्या वाहनांवर कार्यवाही करण्याकरीता विशेष मोहीम राबवुन शहरातील रस्त्यावर फटाके फोडणा-या बुलेट वाहन तसेच मॉडिफिकेशन केलेले वाहनांचा शोध घेवुन सदर बुलेट वाहनांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात आली असुन चालू वर्षात आज पावतो एकूण 1206 वाहनावर कायदेशीर कार्यवाही करून 1,90,000/- रुपये दंड शासन जमा करण्यात आला आहे.
          

               
 (विलास पाटील)

                 पोलीस निरीक्षक

              श.वा.नि.शाखा,अकोला
कारवाईचे दरम्यान वाहनाचे फटाके फोडणारे सायलेन्सर जप्त करण्यात येते. सदरचे जप्त करण्यात आलेले सायलेन्सर हे माननीय सह दिवाणी न्यायाधीश (क स्तर) तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी कोर्ट क्रमांक ०७,अकोला यांचे कडून सदरचे सायलेन्सर नष्ट करण्याची लेखी परवानगी घेऊन आज रोजी माननीय अपर पोलीस अधीक्षक अकोला यांचे मार्गदर्शनात शहर वाहतूक नियंत्रण शाखा कार्यालय येथे रोड रोलर द्वारे नष्ट करण्याची कार्यवाही करण्यात आली. सदर कारवाई दरम्यान अंदाजे 150 ते 200 फटाके फोडणारे सायलेन्सर नष्ट करण्यात आले.


               सदर प्रकारची कारवाई भविष्यातही अशाच प्रकारे राबविण्यात येणार आहे, त्यामुळे कर्कश आवाज कारणारे सायलेन्सर लावून फिरणाऱ्या वाहन चालकांना सतर्क राहण्याचा इशारा शहर वाहतूक नियंत्रण शाखे तर्फे देण्यात आला आहे. तरी वाहन चालकांनी नियमाचे पालन करूनच वाहन चालविणे असे आवाहन पोलीस निरिक्षक विलास पाटील, शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला यांचे कडुन करण्यात येते .


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या