२६ डिसेंबर भारतीय कम्युनिस्ट पक्ष वर्धापन दिन
जगण्या साठी लढा.! लढण्या साठी जगा..! कॉ. रमेश गायकवाड
भारतीय कम्युनिस्ट पक्ष अकोला कार्यालयात सकाळी. ११ वा. ध्वजारोहन करुण सभा घेण्यात आली सभेत अकोला भारतीय कम्युनिस्ट पक्ष अकोल्याचे सचिव कॉ. रमेश गायकवाड मार्गदर्शन करीत म्हणाले की २५ डिसेंबर १९२५ रोजी लाल बावटा *कम्युनिस्ट पक्षाचा* भारतात उदय झाला आणि लाखो शेतकरी शेतमजुर कामगार कष्टकरी श्रमिकांना भारतीय कम्युनिस्ट पक्ष आशेचा किरण दिसला. पुढे ह्या लाल बावट्याखाली हजारों निस्वार्थी निर्भीड झुंजार वृत्तीचे लढाऊ कॉम्रेड तयार झाले आणि जणु काही त्यांनी स्वातंत्रचा विडाच उचलला असंघटित शेतकरी शेतमजुर कामगार कष्टकरी श्रमिकांना संघटित करुन लढे निर्माण करुण गोवा मुक्ति आंदोलन, भारताच्या स्वातंत्र करिता हजारो पक्षाच्या कार्यकर्त्यानि आपला जिव गमावुन देशावर बलिदान होवुन अखंड भारताची निर्मिति करुण सर्व माणसांना आपला संविधानिक हक्क मिळवुन दिला.
आता जगण्या साठी लढून शाषन प्रशासनाशी भांडवलदारांशी कडवी झुंज देऊन त्यांना त्यांचा न्याय हक्क मिळवुन द्यायचे आहे.
शेतकरी कामगारचे अनेक प्रश्न सोडविल्याने आज अनेक शेतकरी शेतमजुर कामगार कष्टकरी श्रमिकांच्या खांद्यावर अभिमानाने भारतीय कम्युनिस्ट पक्षा झेंडा फडकत आहे.
आज २६ डिसेंबर २०२२ रोजी आपन सर्वोच्च बलिदान, त्याग, अविरत, संघर्षाचे गौरवशाली ९७ व्या वर्षांचा वर्धापन दिन साजरा करीत आहो.
पुढे सन्माने आपल्या हक्क करीता जगण्या साठी लढावे लागेल आणि लढण्यासाठी जगावे लागेल..!
या नंतर अनेक मान्यवरांनी आपले मत मांडले सभेचे संचालन कॉ. सविता प्रधान, यांनी तर आभार प्रदर्शन कॉ. त्रिवेणी मांवटकर यांनी सभेत कॉ. रमेश गायकवाड, कॉ. त्रिवेणी मानवटकर, कॉ. सविता प्रधान, कॉ. प्रिया वरोटे, कॉ. मीरा खांदिवाले उपस्थित वर्धापन दिन साजरा करण्यात आले असे असे कॉ. रामादास ठाकरे यांनी कळविले आहे..! कॉ. नयन गायकवाड भाकप/आयटक कामगार संघटना उपाध्यक्ष अकोला, उपाध्यक्ष वाशीम, बुलढाणा, अकोला कामगार वकील संघ .
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या