शेजारच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या
पोलीस स्टेशनमध्ये ग्राम पुंडा येथे दि २८ डिसेंबर २०२२ सकाळी ०८.०० पुडा ते बांबरडा रोडवर सचिन बांगर हा व्यायाम करण्याच्या लोखंडी अँगलला गळफास घेवुन लटकलेला दिसला. पोलीस तपासात गळफासाची दोरीचा व्रण आणी आणखी एक दोरीचा व्रण दिसुन आला. तसेच पायाला खरचटल्याच्या जखमा, त्या मधुन रक्त निघत अल्याचे दिसुन आले. यावरून मृताला अज्ञात व्यक्तीने जिवे मारून टाकले व पुरावा नष्ट करण्या करीता लोखंडी ऐंगललि लटकविले. अशा सागर संगीतराव सानप यांचे जबानी रिपोर्ट व डॉक्टर सर्टीवरून पोलीस स्टेशन येथे अ. ४१५/२२ कलम ३०२,२०१ गुन्हा दाखल केला आहे.
सदर गुन्हयाचा तपास मा. पोलीस अधिक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राउत, मंडल सहायक पोलीस अधिक्षक रितु खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली करून तपासादरम्यान आरोपी मृतक याची पत्नी कंचन सचिन बांगर हिंस सखोल विचारपूस केली असता, तिने तिचा पती हा तिला दारू पिवून खुप शारिरीक व मानसिक त्रास देत असल्याने तिने गावातीलव शेजारी राहणारा डिगांबर प्रभाकर मालवे यास ३०,०००/रुपये देण्याचे सांगुन जिवे मारून टाक असे प्रलोभन देवून आपले पतीचा प्रथम राहते घरी दोरीने गळा आवळून खुन केला. त्यांनतर त्याचे प्रेत गावाने बाहेरील मुलांचे व्यायाम करण्याचे पुलअप्सला दोरीने बांधून लटकवून फासी घेतल्याचा बनावा केला. तपासादरम्यान सदर बाब निष्पन्न झाल्याने दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन, सदरची कार्यवाही दहीहांडा पोलीस स्टेशन अंतर्गत ठाणेदार सुरेंद्र राउत पोउपनिरीक्षक शिल्पा थुर्वे, अरुण घोरमोडे, अनिल भांडे, मिलेश गावंडे, रामेश्वर भगत, प्रफुल डिझेकार, मनिष वाकडे, निलेश, भारती ठाकुर यांनी केली
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या