अकोला-अकोट ट्रेनवर झाली दगडफेक, बोगीतील प्रवासी जखमी
अकोला अकोटचा रस्ता बंद झाल्यामुळे अकोला अकोट येथून जाणारे नागरिक रेल्वेने प्रवास करून इच्छित स्थळी पोहोचतात. अकोटला जाणारे प्रवासी बुधवारी सायंकाळी सहा वाजता अकोला अकोट गाडीत चढले होते. वेळापत्रकानुसार ट्रेन आपल्या इच्छित स्थळी रवाना झाली. स्टेशनपासून काही अंतरावर नायगाव संकुलाला लागून असलेल्या रेल्वे रुळावरून गाडी जात असताना काही अज्ञात तरुणांनी बोगीवर दगडफेक केली. त्यामुळे बोगीतील प्रवासी जखमी झाले. अश्या घटनांनी प्रवाशी दहशतीत येऊन रेल्वे प्रवास टाळणार आहेत त्यामुळे रेल्वेच्या उत्पन्न घटणार असल्याने अश्या घटनांना पायबंद घालण्यासाठी रेल्वे विभागाने पुढाकार घ्यावा अशी मागणी होत आहे. या घटनेत बोगीतील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
गाडी अकोटला येताच प्रवाशाने अकोट शहर पोलीस ठाणे गाठले. जिथे पोलिसांनी त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला तक्रार नोंदवण्यास सांगितले, परंतु प्रवाशी खूपच घाबरला असल्याने पोलिसांनी त्याचे सांत्वन केले आणि गुरुवारी सकाळी येण्यास सांगितले. या संदर्भात दक्षिण मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी अशी कोणतीही घटना घडल्याची माहिती नसल्याचे सांगितले होते अकोट शहरातील संकल्प कॉलनीतील रहिवासी ६४ वर्षीय तुळशीदास शंकरराव रायबोले हे तिकीट क्रमांक ८९०३७८३७ बोगी क्रमांक ९९७७३९ मधून प्रवास करत असताना अकोटकडे जाणाऱ्या रेल्वेवर झालेल्या दगडफेकीत अन्य एका प्रवाशासोबत दगडफेक झाल्याने ते जखमी झाले. अश्या घटनांना पायबंद घालण्यासाठी रेल्वे विभागाने पुढाकार घ्यावा अशी मागणी होत आहे.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या