पक्षी सप्ताहामध्ये जखमी पक्षीला चंद्रग्रहणावेळी जीवनदान
स्टेट बँक कॉलनी सहकार नगर मधील नागरिकांनी पक्षाला दिले जीवदान. राजेश्वर स्टेट बँक कॉलनी सहकार नगर अकोला येथे सायंकाळी सातच्या दरम्यान परिसरात नागरिक जवळच असलेल्या बेंचवर ग्रहणाविषयी चर्चा करीत असताना हनुमान मंदिरासमोर त्यांना एक पक्षी वरुन खाली पडताना दिसुन आला.पक्षी तिथे तडफडत असताना आजूबाजूला असलेल्या कुत्र्यांनी त्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी प्रभाकर रुमाले सर, प्रा सागर नारखेडे सर, गोपाल ठाकूर. यांनी आरडा ओरड करून कुत्र्यांना तेथून बाजूला हाकलले व त्या पक्षाजवळ गेले.
गोपाल ठाकूर यांनी घरून पाणी आणून त्या पक्षाला पाणी पाजले दहा ते पंधरा मिनिटात तो पक्षी उठून बसला.तेव्हा रुमाले सर यांनी पक्षाला उचलून मंदिराच्या ओट्यावर नेऊन ठेवले थोड्यावेळाने तो पक्षी चांगलाच हालचाल करायला लागला परंतु त्यामध्ये उडण्याची क्षमता दिसत नव्हती. गोपाल ठाकूर यांनी सर्पमित्र पक्षीमित्र बाळ काळणे यांना फोन करून बोलाविले. काळने यांनी हा पक्षी सप्ताह सुरू असल्याबाबत सुद्धा माहिती दिली याप्रसंगी परिसरातील नागरिक खाडे काका, राहुल खंडाळकर, कु खुशी ठाकूर, अमितेश गुलाये. उपस्थित होते.
0 टिप्पण्या