Ticker

6/recent/ticker-posts

हजारो भाविकांनी घेतला कार्तिकस्वामींच्या दर्शनाचा लाभ 

हजारो भाविकांनी घेतला कार्तिकस्वामींच्या दर्शनाचा लाभ 
   

   
प्रतीनीधी -  संतोष माने  
मूर्तिजापूर: कार्तिक महिन्यातील कृतिका नक्षत्रात कार्तिकस्वामींच्या दर्शनाचे महत्व अनन्यसाधारण आहे आणि या पर्वावर माहिलांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश दिला जातो, अशा कार्तिकस्वामीच्या येथील दूर्मीळ मंदीरात आज हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. 


         ज्याचा दहा दिवसांचा उत्सव दरवर्षी भाद्रपद महिन्यात केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर सातासमुद्रापल्याडही उत्साहात साजरा होतो, त्या गणरायाचा भाऊ कार्तिकेयन मात्र अशा उत्सवी वातावरणापासून दूर, काहीसा अलिप्तवादी आहे. त्याची मंदीरेही फारशी नाहीत. जिल्ह्यातील एकमेव असे कार्तिकस्वामींचे मंदीर मूर्तिजापूर शहराच्या जमादार वाडीतील मार्कडेश्वर मंदिराच्या तळघरात आहे. मंदिरातील कार्तिकेयाची मूर्ती सुंदर सुरेख व षण्मुखी आहे. तळघरात वर्षभर पाणी असते. श्री कार्तिकेय स्वामींचे दर्शनाने भक्त धन धान्य वैभव सम्पन्न होतो अशी धार्मिक मान्यता असल्यामूळे येथे महाराष्ट्र व परप्रातांतून हजारो च्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. या मंदिराचे वैशिष्ट म्हणजे येथे सम्पूर्ण शिव परिवाराची स्थापना करण्यात आलेले आहे. कार्तिकेय मंदिराच्या वरिल मार्कंडेश्वर मंदिरात मार्कण्डेश्वर (महादेव आणि मार्कण्डेय मुनी). सोबत यमराजाची मूर्ती. माता पार्वती, श्रीगणेश व नारायणाची मूर्ती आहे. मंदिरात पूर्वमुखी हनुमान, माता गायत्री, सूर्य व कालभैरवाची आणि आदिशक्ती स्वरूप देवतेची मूर्ती आहे. कार्तिक महिन्यात कृतिका नक्षत्राच्या पर्वावर कार्तिकस्वामींच्या दर्शनाला खूप महत्व आहे. त्या पर्वावर भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या