अनियंत्रित एसटी बस झाडावर आदळली
अकोला - दिग्रसहून अकोल्याकडे येणारी बस अचानक नियंत्रणाबाहेर जाऊन कान्हेरी आळंदा दरम्यान मध्यभागी एका झाडाला धडकली. यामध्ये सुमारे 25 ते 30 प्रवासी प्रवास करत होते, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून प्रवाशांना कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ही घटना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस क्रमांक mh 07 C 9151 दिग्रसहून मानोरा, मगरूळपीर मार्गे अकोल्याकडे येत होती. टाकळी ते अकोला दरम्यान सायंकाळी साडेसात वाजता बार्शीटाकळी वरून निघालेली गाडी कान्हेरी सरप जवळ आली असता हा अपघात झाला. रात्रीच्या अंधारात प्रवाशांना बराच वेळ दुसऱ्या बसची वाट पहावी लागली. असे बसमधील प्रवाशांनी सांगितले.
0 टिप्पण्या