Ticker

6/recent/ticker-posts

दानवे यांनी भाजपा - शिंदे गटावर ओढलेत ताशेरे

दानवे यांनी भाजपा - शिंदे गटावर ओढलेत ताशेरे


अब्दुल सत्तार हे विकृती आहे, ते कुठेही जाईल तर असेच वागतील, असा टोला दानवे यांनी सत्तार यांच्या पीए च्या झालेल्या वादावर लागवलाय. सरकार हे बोलाची कडी आणि बोलाच भात आहे. कोट्यवधीची घोषणा सरकार करत आणि शेतकऱ्यांच्या खात्यात एक रुपयाही नाही, हे सरकार धनदांडग्यांच आहे, गुजरातला मदत करणार आहे. अशी जहरी टीका दानवे यांनी केलीय. साध्याच सरकार स्थगितीच सरकार आहे, यामुळे जनतेच्या कामाचा विकास थांबला आहे. जनतेची कामे लवकरात लवकर झाली पाहिजे अशी मागणी दानवे यांनी केली आहे.


जिल्हा परिषद मधील शिक्षण विभागाचा गलथांग कारभार चव्हाट्यावर, गेल्या एक वर्षापासून शालेय विद्यार्थ्यांना झाले नाही पोषण आहार चे वाटप, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली जी प च्या अधिकाऱ्यांची कान उघाडणी



ठाकरे गटाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्तीतीत आढावा बैठक घेतली, या बैठकी दरम्यान जिल्हा परिषद च्या शिक्षण विभागाची पोल खोल करण्यात आली, या दरम्यान अत्यंत गंभीर प्रकार समोर आला असून या मध्ये जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे गेल्या एक वर्षापासून शालेय विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार चे वाटपच केले नसल्याचे स्पष्ट झाले, शालेय पोषण आहाराचे वाटप न झाल्यामुळे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जिल्हा परिषद प्रशासनावर तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली, याचबरोबर अकोला जिल्ह्यातील मेळघाट तसेच धारणी परिसरातील कुपोषणाचे प्रमाण चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले. या आढावा बैठकीमध्ये शालेय पोषण आहाराचे वाटप गेल्या एक वर्षापासून का नाही करण्यात आले याबाबत जिल्हा परिषद च्या शिक्षणाधिकारी यांची दानवे यांनी चांगलीच कान उघडणे केली, आज झालेल्या बैठकीमध्ये जिल्ह्यातील 52 मंडळान पैकी 23 मंडळात झालेल्या अतिवृष्टीचा आढावा घेण्यात आला, याचबरोबर नैसर्गिक आपत्ती विभागातर्फे शेतकऱ्यांना आतापर्यंत किती नुकसान भरपाईच्या मदतीचे वाटप करण्यात आले याचा सुद्धा आढावा घेण्यात आला. आजच्या बैठकीमध्ये विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्यासह आमदार नितीन देशमुख, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी, जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.



महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या