Ticker

6/recent/ticker-posts

गांधीग्राम पूलाच दुरुस्तीचे काम युद्ध स्तरावर करून सुविधा उपलब्ध करून द्यावी - आ. सावरकर

गांधीग्राम पूलाच दुरुस्तीचे काम युद्ध स्तरावर करून सुविधा उपलब्ध करून द्यावी - आ. सावरकर 




अकोला
गांधीग्राम येथील पूलच दुरुस्तीचे काम युद्ध स्तरावर करून सर्वसामान्यांना कळविण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी तसेच  विस्तारीकरण चे काम मध्ये नागरिकांनी सहकार्य करावे असे आव्हान भाजपा प्रदेश सरचिटणीस व आमदार रणधीर सावरकर यांनी केले आहे.

अकोला अकोट मार्गावरील गांधीग्राम जवळील पूर्णा नदीवरील ब्रिटिश कालीन जुना पूल चा पियर खचल्यामुळे या मार्गावरील वाहतूक तातडीने इतर मार्गाने वळविण्यात यावी तसेच अकोला अकोट मार्गावरील पूर्णा नदीवरील बांधकामाधीन असलेल्या पूलाचे बांधकाम तातडीने काम सुरू करावे अशा सूचना आमदार रणधीर सावरकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा प्रशासनाला केलेल्या आहेत,


 अकोला अकोट मार्गावरील पूर्णा नदीवरील सुमारे 150 वर्षापेक्षा अधिक काळ झालेल्या ब्रिटिश कालीन पुलाच्या दोन नंबरचा पिअरवर खचल्यामुळे वाहतूक बाधित झाली आहे, वाहतूक सुरक्षित राहावी, कोणतीही हानी होऊ नये याकरिता सदरचा मार्ग बंद करण्यात आला असून याकरिता पर्यायी मार्ग म्हणून अकोला- म्हैसांग- दहीहंडा- अकोट तसेच अकोला- म्हैसाग सासन मार्गे दहीहंडा मार्गाला जोडणारा रस्ता व पुढे अकोट या मार्गाने वाहतूक सुरळीत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने कारवाई करावी अशा सूचना अकोला पूर्वचे आमदार यांनी प्रशासनाला केलेले आहेत ,पूर्णा नदीवरील जुन्या ब्रिटिश कालीन पुलाला पर्याय म्हणून नवीन पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले होते, नदीवरील पुलाचे बांधकाम पूर्ण झालेले असून दोन्ही बाजूच्या पोहच मार्गाचे काम रखडलेले आहे, पुलाच्या पूर्वीच्या संकल्पनेमधे पूल व रस्त्याच्या संरेखानामध्ये बदल झाल्याने भूसंपादन कार्यवाही मध्ये बदल झाला होता , त्यामुळे भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने पुलाच्या दोन्ही बाजूला असलेल्या पोच मार्गाचे काम रखडलेले होते , पुलासह पोच मार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी आता पोच मार्गासाठी आवश्यक असलेली जमीन तातडीने संपादित करून पोच मार्गाचे काम कसे सुरु करता येईल याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग चे मुख्य अभियंता तसेच जिल्हा प्रशासनासोबत चर्चा करण्यात आली असून करीता महसूल प्रशासनाला व सार्वजनिक बांधकाम विभागास त्यासंबंधीच्या सुचना देऊन आवश्यक जमीन ताब्यात घेण्याची कारवाई सुरू करावी, तसेच पुलाच्या बांधकामासाठी तसेच भूसंपादन कामासाठी असा एकूण अतिरिक्त सुमारे ७ कोटी रुपयांची आवश्यकता असून त्या संबंधाने आमदार रणधीर सावरकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री माननीय रविंद्रजी चव्हाण यांच्यासोबत तसेच सचिव बांधकाम यांच्यासोबत चर्चा केलेली आहे, राज्यातील जुन्या पुलांचे स्ट्रक्चर ऑडिट करण्यासाठी शासनाने तातडीने पाउले उचलावीत अशी विनंती सुद्धा आमदार रणधीर सावरकर यांनी मंत्री सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे कडे केली आहे



ब्रिटिश कालीन गांधीग्राम येथील पूल याची जर्जर अवस्था लक्षात घेता वाहतुकीसाठी रस्ता बंद करण्यात आला आहे त्यामुळे अकोट तसेच खारपान पट्ट्याकडे जाणाऱ्या नागरिकांना फार मोठ्या प्रमाणात गैरसोय निर्माण होत आहे यासाठी नॅशनल हायवे विभागाने प्राथमिक देणे दळणवळणाच्या दृष्टीने उपयोगी व्हावे त्यासाठी तात्पुरती  डागडुजी करण्याचे काम आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तज्ञ लोकांशी चर्चा विनिमय करून ताबडतोब त्याची व्यवस्था करण्यात यावी यासाठी केंद्रीय दळणवळण मंत्री  नितीन गडकरी व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याविषयी माहिती देऊन याबद्दलची गंभीरता व नागरिकांना होणारा त्रास गैरसोय याबद्दल आमदार रणधीर भाऊ सावरकर यांनी माहिती दिली व प्राथमिक देणे याविषयी लक्ष केंद्रित करून यामधील मार्ग काढण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहे तसेच या संबंधात जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा लक्ष केंद्रित करून संबंधित विभागाला योग्य ते सूचना द्यावा व नागरिकांना त्रास होणार नाही तसेच दिवाळीच्या सणामध्ये कोणतेही दुर्घटना घटू नये यासाठी प्रशासनाने लक्ष केंद्रित करण्याच्या सूचनाही सुद्धा आमदार सावरकर यांनी दिल्या आहेत.  नागरिक नागरिकतेने नागरिकांनी सुद्धा तोपर्यंत या पुला वापर करू नये. अशी विनंती केली


*गांधीग्राम पूल रहदारीसाठी बंद; पर्यायी मार्गावरुन वाहतुक*
व्यवस्थेचा वापर करावा
 :-  गांधीग्राम येथील जुन्‍या पुलाला तडा गेल्‍यामुळे त्‍यावरील वाहतूक संपुर्णपणे बंद करण्यात आली आहे. हा पूल तातडीने दुरुस्त करुन वाहतुकीसाठी पुर्ववत खुला होईपर्यंत  अकोला – अकोट रहदारीकरीता पर्यायी मार्ग म्‍हणून अकोला – म्‍हैसांग – सासन (किनखेड दहीहांडा राज्‍य मार्गास जोडणारा) व अकोला – म्‍हैसांग – दर्यापूर – अकोट राज्‍य मार्ग वळविण्‍यात आला असल्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहेत.


या संदर्भात कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला यांनी प्रस्तावित केल्यानुसार ही रहदारी वळविण्यात आली आहे. या आदेशान्वये अकोला ते अकोट रहदारीसाठी पर्यायी मार्ग म्‍हणून अकोला – म्‍हैसांग – सासन (किनखेड दहीहांडा राज्‍य मार्गास जोडणारा) व अकोला – म्‍हैसांग – दर्यापूर – अकोट या मार्गे वळविण्यात आली आहे. गांधीग्राम येथील पुल दुरुस्तीसाठी बंद करण्यात आला असल्याचे आदेशात म्हटले आहे.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या