Ticker

6/recent/ticker-posts

ज्ञानप्रकाश आर्ट्स कॉलेजमध्ये कोविड लसीकरण शिबिर

ज्ञानप्रकाश आर्ट्स कॉलेजमध्ये कोविड लसीकरण शिबिर


पिंजर येथील भाऊसाहेब लहाने ज्ञानप्रकाश आर्ट्स कॉलेज मध्ये राष्ट्रीय सेवा योजना व मराठी विभागाच्या वतीने covid-19 च्या निर्मूलनासाठी दिनांक 01 सप्टें.2022रोजी भव्य लसीकरण(बुस्टर डोस) शिबिराचे आयोजन करण्यात आले. पिंजर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व त्यांचे कर्मचारी आरोग्य सेविका वनिता विश्वनाथ चव्हाण , गटप्रवर्तक रेणुका विनोद बोबडे, डी ई ओ. कु. वैष्णवी गजानन हागे, आशा कर्मचारी वनिता रामेश्वर खाडे,यांनी सदरच्या कार्यक्रमासाठी मोलाचे योगदान दिले. कार्यक्रमाची सुरुवातीला मराठी विभागातील डॉ.अशोक विठ्ठलराव वाहुरवाघ यांनी लसीकरणाचे महत्त्व विशद करून विद्यार्थ्यांना त्याविषयी अवगत केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विनोद खारोडे यांनी रीतसर कार्यक्रमाचे उद्घाटन करून स्वतः तिसरा डोज घेऊन लसीकरणाची सुरुवात केली. महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख सुनील मनवर , शा. शि. संचालक डॉ. नानासाहेब सपकाळ तसेच शिक्षकेतर कर्मचारी संतोष गिरी,श्याम खापर्डे , गंगारामजी वानखडे यांनी तसेच महाविद्यालयीन बहुसंख्या विद्यार्थ्यांनी लसीकरणाचा लाभ घेतला.या कार्यक्रमाला, मराठी विभाग प्रमुख मनोज फडणीस , समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ.अनिल ठाकरे , राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.वासुदेव भगत, शा.शि.संचालक डॉ.नानासाहेब सपकाळ ग्रंथपाल रेखा काळबांडे व इतर शिक्षकेतर कर्मचारी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. सदरच्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या सफल केला. उपरोक्त कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पंकज तायडे सरांनी केले तर आभार प्रदर्शन इंग्रजी विभाग प्रमुख व रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा.रामकृष्ण गावंडे सरांनी केले.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या