Ticker

6/recent/ticker-posts

छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण मैदानाचे सौंदर्यीकरण

छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण मैदानाचे सौंदर्यीकरण


अकोला.
 पर्यावरणासोबत सौंदर्यीकरण तसेच नागरिकांच्या,जेष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी, विद्यार्थ्यांना राष्ट्रभक्ती सोबत कर्तव्य तसेच पर्यावरणासंदर्भात जनजागृती करण्याच्या दृष्टीने भाजपा मनपा माजी नगरसेवक व युवा नेते सागर शेगोकार यांच्या पुढाकाराने तापडिया नगर स्थित छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण या मैदान चे सौंदर्यीकरण ,देखभाल,दुरुस्ती तसेच वृक्षारोपण,संगोपन,व विकास लोक सहभागातून करण्याचा निर्णय स्थानिक युवाशक्ती प्रतिष्ठान नवदुर्गा मंडळ तापडिया नगरच्या युवा कार्यकर्त्यांनी घेऊन एक आदर्श निर्माण केला आहे. सामाजिक दायित्वासोबत अकोला शहराची परंपरा सर्वांना सोबत घेऊन जबाबदारीने कर्तव्यासोबत चांगल्या काम करण्याचा परंपरा स्वर्गीय विनयकुमार पाराशर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तसेच लोकनेते भाऊसाहेब फुंडकर, प्रमिलाताई टोपले, वसंतराव धोत्रे तसेच या भागातील जेष्ठ नागरिकांच्या आदर्श तसेच मा.खा.संजय भाऊ धोत्रे,भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार वसंत खंडेलवाल ,महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात तसेच या भागातील सर्व जातीपाती पंथातील ज्येष्ठ नागरिक ,युवाशक्तीच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाची देखभाल तसेच सौंदर्यीकरण, चांगल्या सुविधा लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांना प्राप्त करून देण्यासाठी युवाशक्ती प्रतिष्ठान नवदुर्गा मंडळ प्रयत्नशील राहणार आहे. पर्यावरणासोबत स्वच्छता, कर्तव्य वृक्ष संगोपनाची जबाबदारी पालकत्व या भागातील युवाशक्ती व जेष्ठ नागरिक स्वीकारणार आहे. 


सागर शेगोकार या भागातील वेगवेगळ्या उपक्रमासाठी सातत्याने प्रयत्नशील राहतात गणपती विसर्जन सोहळा ,रावण दहन सोहळा, नवदुर्गा उत्सव, गणपती उत्सव तसेच मातृशक्तीची वेगवेगळे कार्यक्रम सामाजिक, सांस्कृतिक, धर्म संरक्षण, गोरक्षण सारख्या विविध कार्यक्रम सातत्याने करीत असतात यामध्ये पुन्हा त्यांनी ही जबाबदारी युवाशक्तीच्या बळावर ठेवून या भागातील सर्वात मोठा उद्यान च्या देखभाल मैदान मध्ये क्रीडा सुविधा सोबत ज्येष्ठ नागरिकांना व्यायामासाठी तसेच सकाळी फेरफटका मारण्यासाठी चांगली हवा उपलब्ध होण्यासाठी ही जबाबदारी स्वीकारली आहे त्यांना या भागातील जवळपास 127 युवा कार्यकर्त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली आहे आंतरराष्ट्रीय नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यावरणासंदर्भात जनजागृती करण्याचे निर्देश दिले आहे त्या अनुषंगाने रविवारी दिनांक ०७/०८/२०२२रोजी सकाळी ८:०० वाजता तापडिया नगर स्थित छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण या परिसरात जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांच्या शुभहस्ते महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली आमदार गोवर्धन शर्मा आमदार वसंत खंडेलवाल अर्चनाताई मसने किशोर पाटील यांच्या उपस्थितीत तसेच विविध सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा उपक्रम होणार आहे या कार्यक्रमात परीसरातील नागरिकांनी सहकुटुंब उपस्थित राहून वृक्षारोपण सोबत विविध फुलांची झाडे,शोभेची झाडे ड्रीप वर लावण्यात येणार आहेत या झाडांच्या संवर्धनाची जबाबदारी घेणाऱ्यांचा प्रोत्साहन वाढवण्यासाठी सहपरिवार उपस्थित राहावे ही विनंती युवाशक्ती नवदुर्गा मंडळाच्या वतीने सागर शेगोकार ,हरीश काळे,अंकुश देशमुख, विजय शिंदे, अमीत फोकमारे, निखिल देशमुख, धनराज अहीर,चंद्रकांत दांदळे,उल्हास निवाणे,आनंद बुडईकर,शण्मुख देशमुख, सचिन झाडोकार,गणेश तायडे,गोपाल सोनोने, प्रतिक जयस्वाल ,भावेश सोलंकी व मित्र मंडळाने केली आहे


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या