Ticker

6/recent/ticker-posts

अंधारसांगवी येथे जुगार अड्ड्यावर चान्नी पोलिसांची धाड

अंधारसांगवी येथे जुगार अड्ड्यावर चान्नी पोलिसांची धाड


एका आरोपीसह ४६ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त,


पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत अंधारसांगवी येथे जुगार अड्ड्यावर शुक्रवार रोजी चान्नी पोलिसांनी धाड टाकून एकास अटक केली, त्याच्या जवळून जुगाराचे साहित्य रोख मोटरसायकल असा एकूण ४६ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अंधारसांगवी येथे शुक्रवार रोजी जुगार अड्डा सुरू असल्याची गुप्त माहिती मिळताच चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक गणेश महाजन, हर्षल श्रीवास, योगेश दाभेराव, सुधाकर करवते, यांनी सापळा रचून अंधारसांगवी येथे जुगार अड्डयावर धाड टाकून जुगार चालविणाऱ्या वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील मुंगळा रोड येथील अयाज खान अहमद खान,याला अटक केली त्यांच्या जवळून जुगाराचे साहित्य रोख , मोटरसायकल असा एकूण ४६ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी अयाज खान यांच्याविरुद्ध गुन्हा गुन्हा दाखल केला आहे. प्रतिनिधी नासीर शेख पातूर


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या