Ticker

6/recent/ticker-posts

अकोल्यात सकाळीच पालखीचे आगमन

अकोल्यात सकाळीच पालखीचे आगमन



अकोला विदर्भाची पंढरी संत गजानन महाराजांची पालखी अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात आगमन होताच श्रीचे दर्शन व पूजन करून यंदा चांगला पाऊस येऊन शेतकरी बळीराजा सुखी व्हावा तसेच उद्योगधंद्यांना चांगले दिवस येऊन सर्वांचा कल्याण व्हावा अशी कामना आमदार रणधीर सावरकर यांच्या वतीने सौभाग्यवती मंजुषा ताई सावरकर यांनी केली अकोला शहराच्या परिसरात आषाढी एकादशी निमित्य संत गजानन महाराजांची पालखी पैदल पैदल वारी पंढरपूर विठ्ठल रुक्माई यांच्या दर्शनासाठी जात असते यानिमित्त यानिमित्त पालखीचे भौरद तिथे पालखीचे मुक्काम असते सतत सात वर्षाच्या परंपरेनुसार आमदार रणधीर सावरकर पूजाअर्चा न करता राज्यसभेच्या निवडणुकीत आपल्या मुळे आमदार सावरकर मुंबई असल्यामुळे त्यांच्या वतीने दर वर्षीच्या परंपरेनुसार मंजुषा ताई सावरकर यांनी विशेष पूजा रचना करून संत गजानन महाराजांना शेतकरी सुखी संपन्न व्हावा असे साकडे घातले 


तसेच अकोला लोकसभा मतदार संघाच्या संजय भाऊ धोत्रे यांच्या वतीने अनुप धोत्रे यांनी विशेष पूजा-अर्चना करून श्री चे दर्शन घेतले यावेळी एडवोकेट देवाशीष काकड तुषार भिरड, रवी खेडकर अंबादास उमाळे, शंकरराव वाकोडे,, श्याम विंचनकर, विद्या ताई भरणे गजानन शेळके, रंजना विचनकर, शिवाहिंगणे, मोहन पारधी राजेश लुंगे काकड, आधी प्रामुख्याने उपस्थित होते.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या