महाराष्ट्रात राजकिय भूकंप?
सेनेचे ३५ आमदार घेवून मंत्री एकनाथ शिंदे नॉट रीचेबल
विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून या निवडणुकीत मतं फुटल्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारकडून या पराभवाची चाचपणी सुरु झाली आहे. असं असतानाच शिवसेनेचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या ३५ आमदारांसहीत विधान परिषदेच्या निकालानंतरपासून संपर्कात नसल्याने शिवसेनेची धाकधूक वाढलीय. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपाला राज्यसभेपेक्षाही दहा मतं अधिक मिळाल्याचं उघड झालं असून महाविकास आघाडीतील मित्रपक्षांची अनेक मतं फुटल्याचं यावरुन स्पष्ट झालंय. विशेष म्हणजे कालच्या निवडणुकीदरम्यान सचिन आहिर वगळता कोणीही प्रसारमाध्यमांशी चर्चा केली नाही.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या