Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये नव्याने पदभरती करण्यात यावी, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना निवेदन

जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये नव्याने पदभरती करण्यात यावी, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना निवेदन


आरोग्य विभागातील जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला कंत्राटी पदभरतीत महाघोटाळा प्रकरणी स्थापन केलेली पडताळणी समिती बरखास्त करुन विशेष लेखा परिक्षण पथका कडुन निःपक्षपाती चौकशी करणे बाबतचे आदेश तातडीने निर्गमित करुन दोषी अधिकारी / कर्मचारी यांचेसह संबधीत बाहयस्त्रोत कंपणी वर कडक कार्यवाही करण्याचे आदेश आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या निवेदनातून भारत कैलास उपर्वट, रा. देऊळगाव ता पातुर जि. अकोला व सुजित मनोहर उपर्वट, रा. देऊळगाव ता. पातुर जि. अकोला यांनी केला आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागातील भ्रष्टारामुळे शासनाची नाहक बदनामी होत आहे. व आपण कर्तव्यदक्ष, होतकरु, प्रामाणीक व लोकप्रिय महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री या पदावर विराजमान असतांना अशा घटना वारंवार आरोग्य विभागात घडत असल्यामुळे जनतेच्या / नागरीकांच्या मनामध्ये रोष निर्माण होत आहे. आरोग्य विभागातील भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी यांचेमुळे आरोग्य विभागाची प्रतिमा हि मलीन होत आहे. करीता याबाबत आपण व्यक्ती: शा लक्ष देऊन भ्रष्टाचारी अधिकारी व कर्मचारी यांचे समुळ उच्चाटन करून आरोग्य विभाग हा भ्रष्टाचार मुक्त करुन निरोगी करावा अशी आपणास विनंती आहे.


कर्मचारी यांच्या अकोला या ठिकाणा वरुन अतितात्काळ ईतरत्र जिल्हातील ठिकाणी बदली / पदस्थापना करण्यात यावी. तसेच जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला येथील कंत्राटी आरोग्य पदभरती प्रकरणी उपसंचालक अकोला या कार्यालयाची पडताळणी समिती तात्काळ रदद करुन राजस्तरावरील विशेष लेखा परिक्षण पथकाची नेमणुक करुन अथवा विद्यमान मा. उच्च न्यायालयाचे सेवा निवृत्त मा. न्यायाधिश महोदय यांचे कडुन सदर प्रकरणी निःपक्षपाती पणे या प्रकारणाची सखोल चौकशी करण्यात यावी दोषी असणारे सर्व व अधिकारी / कर्मचारी यांचेसह संबधीत असलेल्या कंपणीचे नाव काळ्या यादीमध्ये समाविष्ट करून सदरील झालेली पदभरती तात्काळ रदद करण्यात यावी. व नव्याने बाहयस्त्रोत स्वरुपातील पदभरती प्रक्रिया हि शासन स्तरावरुन याबाबतची पदभरती करावी व संबधीतांवर प्रशासकीय कार्यवाहीसह फौजदारी स्वरुपाची कार्यवाही तात्काळ करण्यात यावी अशी विनंती निवेदनातून करण्यात आली आह. अन्यथा आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबवावा लागेल असा इशारा यावेळी देण्यात आला


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या