बाभुळगांव ते आलेगांव रस्त्याच्या कामाला सुरुवात
अकोला (प्रती) अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील बाबुळगाव ते आलेगाव या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती या रस्त्यावर मधोमध मोठमोठे खड्डे पडले होते लोकांना ये-जा करण्याकरिता खूप त्रास सहन करावा लागत होता रुग्णाला व गर्भवती महिला हॉस्पिटल यासाठी अत्यंत कसरत करावी लागत होती या रस्त्याच्या मागणीकरिता परिवर्तन स्वाभिमानी संघटनेचे महाराष्ट्र सचिव सतीश तेलगोटे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन सदर रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती त्यांची हे मागण्या मान्य होऊन या रस्त्याच्या डांबरीकरणाचे सुरुवात करण्यात आली आहे रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली म्हणून परिवर्तन स्वाभिमानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उमेश इंगळे तता महाराष्ट्र सचिव सतीश तेलगोटे यांचे स्थानिक नागरिकांनी आभार मानले
0 टिप्पण्या