Ticker

6/recent/ticker-posts

काटेपूर्णा अभयारण्यात आज वैशाख पौर्णिमेला प्राणी गणना

काटेपूर्णा अभयारण्यात आज वैशाख पौर्णिमेला प्राणी गणना


बुद्ध पौर्णिमेला सर्वात मोठा अनुभव : वनविभागाचा उपक्रम


वैशाख पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात जंगलातील शांतता व वन्य 3 प्राण्यांना जवळून पाहण्याची अनुभूती काही वेगळीच असते. गत दोन वर्षे कोरोनामुळे होऊ न शकलेली बौद्ध पौर्णिमेच्या रात्री प्राणी गणना यंदा न सोमवारी १६ मे रोजी होणार आहे. र अकोला वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या काटेपूर्णा अभयारण्यात १६ मचानांची व्यवस्था करण्यात आली असून, निसर्ग प्रेमींना या मचानांवर बसून निसर्ग अनुभव घेता येणार आहे. बौद्ध पौर्णिमेच्या शुभ्र चंद्र प्रकाशात निसर्ग प्रेमींना निसर्ग अनुभव घेता यावा यासाठी वनविभागाकडून निसर्ग अनुभव (मचान गणना) हा उपक्रम घेण्यात येतो. गत दोन वर्षे कोरोनामुळे म हा उपक्रम राबविण्यात आला नाही. प्र - यंदा १६ मे रोजी मचान गणनेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी संकेतस्थळावर ऑनलाईन बुकिंग सुरू आहे. नोंदणी केलेल्या निसर्ग प्रेमींना काटेपूर्णा अभयारण्यात विविध ठिकाणी पाणवठ्यांशेजारी उभारण्यात आलेल्या १६ मचानांचे वाटप करण्यात येणार आहे. या मचानांवर बसून पाणवठ्यावर येणाऱ्या प्राण्यांची गणना करण्याचा अनुभव निसर्ग प्रेमींना घेता येणार आहे.


एका मचानावर एक किंवा दोघांची व्यवस्था

उभारण्यात आलेल्या एका मचानावर एक किया दोन निसर्ग प्रेमींची व्यवस्था करण्यात येणार आहे. या मचानावर निसर्ग प्रेमीबरोबर वनविभागाचे कर्मचारी किया स्वयंसेवी संस्थांचे मार्गदर्शक असणार आहेत. नोदणी झालेल्या निसर्ग प्रेमींना सोमवारी सकाळी दहा वाजता अभयारण्यात प्रवेश दिला जाणार असून, त्यानंतर दुपारी २ वाजता त्यांना मचानावर नेण्यात येईल.


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या