Ticker

6/recent/ticker-posts

नर्सेस संघटनेचा प्रलंबित मागण्या विषयी सहमहाराष्ट्रसंचालक आरोग्य सेवा मंडळ कार्यालय पुणे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा

नर्सेस संघटनेचा प्रलंबित मागण्या विषयी सहमहाराष्ट्रसंचालक आरोग्य सेवा मंडळ कार्यालय पुणे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा 


महाराष्ट्र राज्य नर्सेस संघटना र.न.3130 प्रलंबित मागण्या विषयी सहमहाराष्ट्रसंचालक आरोग्य सेवा मंडळ कार्यालय पुणे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा आज 06 मे 2022 रोजी राज्यस्तरावरील महाराष्ट्र जिल्हा परिषद नर्सेस संघटना रजिस्ट्रेशन नंबर 3130 सलग्न महासंघ यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा परिषद नर्सेस संघटनेचे प्रतिनिधित्व नेतृत्व करता संहसंचालक आरोग्य सेवा मंडळ कार्यालय पुणे येथे माननीय सहसंचालक माननीय स्वप्नील लाळे सर तसेच, मुख्य प्रशासकीय अधिकारी मॅडम माननीय स्मिता कारेगावकर यांच्यासोबत राज्यस्तरावरील महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नर्सेस संघटनेच्या खालील मुद्द्यावर अतिशय सकारात्मक चर्चा करून प्रत्येक मुद्द्यांवर अतिशय सकारात्मक आश्वासन दिले.


 महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नर्सेस संघटना यांच्या प्रलंबित मागण्या खालील प्रमाणे आहेत आरोग्य सेविका आरोग्य सेवक यांचे 2022 नुसार नवीन सुधारित जॉब चार्ट तयार करून देण्यात यावेत. प्रत्येक उपकेंद्रा अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारच्या डाटा एन्ट्री कराव्या लागत आहे त्यांच्या व्यवस्थित विभागणी करण्यात येऊन नोडल ऑफिसर नुसार व नोडल कर्मचाऱ्या नुसार व्यवस्थित विभागणी करण्यात, याव्यात आर.सी.एच डाटा एन्ट्री आरोग्य सेविकेंनी करावी , IHIP dhis2 data entry mpw नी करावी NCD data entry  यानी करावी उपकेंद्र स्तरावरील इलेंक्ट्रिक बिल भरण्याची जबाबदारी एकट्या आरोग्य सेविकेची नसून हे संपूर्ण नियुक्त कर्मचाऱ्यांची असेल. तसेच उपकेंद्र स्तरावरील निवासस्थानातील मीटर हे वेगळे करण्यात येऊन, वेगळे बसविण्यात यावी ही सुद्धा सकारात्मक चर्चा करण्यात आली .तसेच केंद्र शासनाने नियुक्ती करण्यात आलेले कंत्राटी समुदाय आरोग्य अधिकारी हे उपकेंद्र वरील सनियंत्रक ,कंट्रोलर ऑफीसर नसून उपकेंद्र स्तरावर त्यांनी समंन्वयाने त्यांच्या डिग्रीचा व उच्च शिक्षणाचा योग्य परीने वापर करून दर्जेदार सेवा या समन्वयातून सर्व खेळीमेळीच्या वातावरणात लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात याव्यात अशी सकारात्मक चर्चा सहसंचालक सरांनी केली. तसेच उपकेंद्र स्तरावरील, बळकटीकरण व HWC नीधि कॅश बुक, लेजर बुक लिहिण्याची जबाबदारी ही प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील लिपिकांची, असेल अशी सुद्धा सकारात्मक चर्चा सहसंचालक सरांनी दर्शविली. 


तसेच प्रत्येक प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रावर ओ.पी.डी आरोग्य सेविके करिता व उपकेंद्र स्तरावर एक NRHM अंतर्गत कंत्राटी आरोग्य सेविका नियुक्ती असायला पाहिजेततसेच प्रशिक्षण केंद्र ,जिल्हा परिषद व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय येथे प्रत्येकी एक आरोग्य सेविका व आरोग्य साहाय्यिंकांची पद असायला पाहिजेत अशी सुद्धा सकारात्मक चर्चा करण्यात आली तसेच बहुतांशी रिक्त पदे भरण्यात यावी अतिरिक्त कामाचा अतिरिक्त लोकसंख्येचा ताण आरोग्यसेविके वरुन कमी करण्यात यावा ही सुद्धा चर्चा करण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत यशस्वी कंपनीकडून कंत्राटी डाटा एंट्री ऑपरेटर भरण्यात आलेले आहे त्यांच्याकडून उपकेंद्र स्तरावरील विविध ऑनलाइन डाटा एंट्री चे कामे करून घेण्यात यावीत ही सुद्धा सकारात्मक चर्चा करण्यात आली.


तसेच आज रोजी दि. 06 मे 2022 राज्यस्तरावरील महाराष्ट्र जिल्हा परिषद नर्सेस संघटनेची सकारात्मक चर्चा सहसंचालक आरोग्य सेवा मंडळ कार्यालय पुणे सहसंचालक माननीय स्वप्निल लाळे सरांसोबत करण्यात आलेली आहे चर्चेची इतिवृत्त लेखी स्वरूपातील लवकरात लवकर संघटनेला प्राप्त होणार आहेत प्रत्येकच मुद्द्यांवर अतिशय गंभीरपणे, सकारात्मक चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्‍वासन सहसंचालक माननीय स्वप्निल लाळे सरांनी संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांना दिल्यात चर्चा करत असताना राज्याच्या सचिव नीलिमा तातेकर राज्याच्या कोषाध्यक्ष वैशाली दुर्गाडे , राज्याच्या कार्याध्यक्ष प्रज्ञा तायडे तसेच राज्याच्या संघटक माया शिरसाट पुण्यातील सचिव मीनाक्षी ताई तसेच प्रत्येकी वेगवेगळ्या जिल्ह्यातील जिल्हा अध्यक्ष संगीता जाधव जिल्हा अकोला व सचिव ज्योती रोठे जिल्हा तसेच, गोंदिया जिल्हा, परभणी सातारा सोलापूर चंद्रपूर गोंदिया गडचिरोली प्रत्येक जिल्ह्यातून जिल्हा अध्यक्ष व सचिव चर्चेला हजर होत्या शांता पवार इत्यादी प्रतिनिधी हजर होत्या



अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या