Ticker

6/recent/ticker-posts

प्रतापभाई आशर यांच्या निधनाने ध्येयनिष्ठ आणि समर्पित व्यक्तिमत्त्व हरपले : खासदार संजय धोत्रे

प्रतापभाई आशर यांच्या निधनाने ध्येयनिष्ठ आणि समर्पित व्यक्तिमत्त्व हरपले : खासदार संजय धोत्रे
‌ 


भाजपाचे ज्येष्ठ नेते ,  कोषाध्यक्ष श्री प्रतापभाई आशर  यांच्या निधनाने पक्षाचा  मोठा आधारस्तंभ हरपला आहे.कोषाध्यक्ष म्हणून अतिशय प्रामाणिकपणे निष्ठेने त्यांनी अनेक वर्ष काम केले लोकनेते प्रमोदजी महाजन यांच्या सोबत देशभरात कार्यकर्त्यांची फौज निर्माण केली तसेच. मार्गदर्शकाच्या भूमिकेतून अनेकांना त्यांनी पक्षकार्यासाठी प्रेरित केले. अखेरच्या क्षणापर्यंत ते पक्षकार्यात सक्रिय होते.
प्रसन्नवदन चेहरा आणि समर्पित जीवन यामुळे अनेकांसाठी ते प्रेरणादायी  होते. श्री प्रतापभाई आशर यांच्या निधनाने एका ध्येयनिष्ठ आणि समर्पित व्यक्तिमत्त्व हरपले आहे.  त्यांच्या निधनाने पार्टीची अपरिमित हानी झाली आहे .या दुःखातून सावरण्याचे बळ परमेश्वर त्यांच्या कुटुंबियांना देवो असेही माजी केंद्रीय राज्यमंत्री खासदार संजय धोत्रे यांनी म्हटले आहे.


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या