🌷 मधुकर वानेडकर यांचा समाजातर्फे सत्कार🌷
अकोला: भगवान रविदास कम्युनिटीज फेडरेशनचे विदर्भ विभागीय अध्यक्ष मधुकर वानेडकर दिनांक २३एप्रिल२०२२रोजी७४वर्षे पुर्ण होऊन अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केल्याबद्दल महारूद्र हनुमान मंदिर खेडकर नगर, सुधीर कालनी चौक अकोला येथे समाजातर्फे सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य प्रभाकर रेवास्कर होते.अकोला मी.न.पा.सेवानिवृत शिक्षक संस्थेचे अध्यक्ष राम शेगोकार यांनी त्यांना मानपत्र देऊन त्यांच्या आजपर्यंतच्या सर्व समाज सेवेची माहिती देऊन त्यामध्ये महाराष्ट्र सरकारने त्यांना डाक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्याचे दर्शविण्यात आले आहे.त्याचप्रमाणे ते बहुजन नायक कांशीरामजी यांच्या विचारांना आदर्श मानणारे असल्याचे सांगितले.डाक्टर प्रदीप रामराव डामरे व डामरे परिवारातर्फे शेषराव खाडे लिखित"नियती" हे पुस्तक सप्रेम भेट दिले.
BRCF चे वतीने विष्णू वाडेकर, निरंजन गव्हाळे, श्रीराम राखोंडे, महादेव इंगळे,लक्ष्मण पदमने,सुर्यप्रकाश चंदन, नरहरी राजगुरू, महादेव गवई, शामसुंदर पानझाडे, ओंकार चिमणकर, ओंकार धुमाळे, गजानन चंदन, पांडुरंग वाडेकर, रामभाऊ ताजने,किसन पदमने यांनी शाल व पुष्पगुच्छ देवून गौरविले आणि हार्दिक शुभेच्छा दिल्यात. कार्यक्रम सुत्रसंचलन अँड.शेषराव गव्हाळे आणि आभार प्रदर्शन माजी मुख्याध्यापक किशोर राजगुरू यांनी केले.
अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या