दिलीपबाबू इंगोले यांच्या जीवनपटाचा वेध घेणारी मुलाखत
अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय अकोला यांचा उपक्रम
अकोला-- -- -- श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे विद्यमान कोषाध्यक्ष तथा जीवनात विविध क्षेत्रातील कार्यामध्ये यशप्राप्त व्यक्तीमत्व दिलीपबाबू इंगोले यांच्या ७२ वर्षातील कार्यकर्तृत्व जीवनपटाचा वेध घेणारी प्रगट मुलाखत स्थानिक विमलाबाई देशमुख सभागृहांमध्ये जन्मदिन अभिष्टचिंतन सोहळा कार्यक्रमाच्या निमित्याने संपन्न झाली . श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या बाभूळगाव - अकोला येथील अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयाने हा सुवर्ण योग साधला. महाविद्यालयांतील संगणक विभागाच्या प्राध्यापिका कु. कल्याणी राजाभाऊ गावंडे यांनी आपल्या ओजस्वी वाणीने व अभ्यासू प्रश्नावलीने दिलीप बाबूंच्या जीवनातील विविध क्षेत्रातील पैलूंना आवाज देत या संवाद मैफीलीत रंग भरला . आपल्या खास वन्हाडी भाषाशैलीसाठी व दिलखुलास स्वभावासाठी प्रसिद्ध असणाऱ्या दिलीपबाबू इंगोले यांनी पुन्हा आपल्या निर्भिड व प्रामाणिक व्यक्तिमत्त्वाचा परीचय देत या मुलाखती दरम्यान मुक्तकंठाने सर्व प्रश्नांना समापीय तथा सविस्तर उत्तरे देत उपस्थित चाहत्यांच्या उत्सुकतेचे समाधान केले.
मुलाखतीच्या विषयांमध्ये त्यांचे वडील स्व . रावसाहेब इंगोले यांचे वैभवशाली परंतु सामाजिक व राजकीय कठोरनियमावालीचे पालन करणारे जीवन , जन्मगांव कुंड ( सर्जापूर) येथील पारंपारीक श्रीराम मंदीर ट्रस्ट जबाबदारी , हॉटेल व्यवसाय , श्री शिवाजी शिक्षण संस्था , पंजाबराव बॅक , क्रीडा विश्व व घरातील प्रपंचाची जबाबदारी इत्यादी विषयांचा समावेश होता. प्रत्येक प्रश्नाचे गांभीर्याने वास्तविक उत्तर देऊन त्यांनी आपल्या हृदयातील सर्व भावनांना उपस्थितांमध्ये मिसळण्याची वाट मोकळी करून दिली. यावेळी सभागृहाने हा कष्टमय व यशस्वी दिलीपबाबू जीवनपट अनुभवला. नागरी सत्कार समीतीने या वैशिष्टपूर्ण उपक्रमाबाबत निवेदिका प्रा. कल्याणी गावंडे , आन लाईन चित्रीकरणाची व रेकार्ड व्यवस्थेची जबाबदारी साभाळणारे प्रा. डॉ मंदार देशमुख , नियोजन पक्रीया पार पाडणारे नरेंद्र इंगोले , संजय भोक्से , प्रतिक खुरद ,प्रा. गजानन भारसाकळे व कु अनुश्री काळे तसेच अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय बाभूळगांव - अकोला यांचे या बाबत अभिनंदन करून आभार व्यक्त केले. हि संपन्न झालेली मुलाखत जन्मदिन सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम सुरू होण्याअगोदर बहुसंख्येने कार्यक्रमास उपस्थित सर्वांना व ऑनलाईन पध्धतीने अनुपस्थितांनां दाखविण्यात आली हे उपक्रमाचे फलीत ठरले .
अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या