Ticker

6/recent/ticker-posts

महसूल कर्मचाऱ्यांचा मागण्यांकरीता संप !

महसूल कर्मचाऱ्यांचा मागण्यांकरीता संप !         

            
कारंजा : आज दिनांक - ५ एप्रिल रोजी कारंजा तहसिल कार्यालय कारंजा येथे सर्व स्तरातील विविध महसूल कर्मचारी संघटनाकडून काळ्या फिती लावून तिव्र आंदोलन करीत तहसिलदार धिरज मांजरे यांचे मार्फत,शासनाला बेमुदत संपाचा इशारा देण्यात आला व त्याकरिता सर्व कर्मचारी काम बंद आंदोलन करीत, तहसिल कार्यालया समोर मंडपात बसले होते . याबाबत आमचे प्रतिनिधी दामोधर जोंधळेकर यांनी विविध महसूल कर्मचारी संघटनाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली असता असे कळले की, सेवाज्येष्ठता याद्या बनवितांना ज्येष्ठ कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांवर अन्याय झालेला आहे .


 तरी तो अन्याय दूर व्हावा म्हणून  खऱ्याखुऱ्या प्रामाणिक कर्मचाऱ्यांच्या ज्येष्ठतेनुसार अद्यावत सेवाज्येष्ठता याद्या नव्याने अद्यावत करण्यात याव्यात तसेच ज्येष्ठतेनुसार पात्र कर्मचाऱ्यांना बढती मिळावी . महसूल सहाय्यकांची रिक्त पदे विनाविलंब तात्काळ भरण्यात यावीत आदी मागण्यांकरीता महसूल कर्मचार्यांनी आंदोलनाचे शस्त्र उचलल्याचे वृत्त महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेला प्राप्त झालेले असून, कर्मचाऱ्यांचा संपामुळे तहसिल कार्यालयात कामकाज होऊ शकलेले नाही सर्वत्र शुकशुकाट जाणवत होता असे वृत्त पडताळणी करीता गेलेले पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी कळविले आहे .


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या