कारंजा न प च्या समाज कल्याण अधिकारी अशोक वाडकर यांचा हृदयविकाराने आकस्मिक मृत्यु
कारंजा (लाड) : हजरजवाबी, कार्यतत्पर, हसतमुख, मनमिळाऊ स्वभावाचे असलेले कर्तव्यदक्ष असे समाज कल्याण अधिकारी, कारंजा नगर पालिकेला मिळालेले होते . समाज कल्याण विभागा सोबतच मिळकत विभागही ते यशस्वीपणे सांभाळत होते . कोव्हिड - 19 कोरोना महामारीतही त्यांनी यशस्वीपणे कर्तव्य पार पाडले . अशा मनमिळाऊ अशोकभाऊ वाडकर यांचा मंगळवार दि .29 मार्च 2022 रोजी रात्री 01 :00 वाजता त्यांचे , मुर्तिजापूर येथे, हदयविकाराने आकस्मिक निधन झाले . मृत्युवेळी त्यांचे वय 57 वर्षाचे होते . त्यांच्या मृत्युची बातमी कारंजा येथे कळताच स्थानिक नगर पालिकेत शोककळा पसरली . दि 29 मार्चला त्यांचेवर मुर्तिजापूर येथे अत्यंसंस्कार करण्यात आले . त्यांच्या मृत्युमुळे वाडकर कुटुंबावर अचानक आलेल्या संकटात महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषद तथा साप्ताहिक करंजमहात्म्य परिवार सहभागी असून, सा . करंजमहात्म्यचे संपादक संजय कडोळे यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे .
अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या