ओबीसी राजकीय आरक्षण शिवाय निवणुका घेण्यात येऊ नय- भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर
अकोला
सुप्रीम कोर्टात ओबीसी डाटा व्यवस्थितपणे सादर करण्यात तसेच ओबीसी समाजाची भूमिका समर्थपणे मांडण्यात काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना सरकार अपयशी ठरले असून ओबीसी समाजाला आरक्षण राजकीय न देण्याची त्यांची भूमिका निषेधार्थ असल्याची सांगून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ओबीसी राजकीय आरक्षण शिवाय घेण्यात येऊ नये अशी मागणी अकोला जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी केली आहे.
सुप्रीम कोर्टात ओबीसी समाजाचा डाटा सादर करण्यात व व्यवस्थितपणे भूमिका मांडण्यात राज्य सरकार अपयशी ठरले असून ओबीसी समाजाला न्याय मिळवून द्या अशी भूमिका शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीची या मागे असून केवळ गप्पांचा व देखावा करून ओबीसी समाजाची दिशाभूल करण्याचे काम गेल्या अडीच वर्षात शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी सरकार करत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका ओबीसी समाजात राजकीय आरक्षणाशिवाय होऊ नये ही भूमिका भारतीय जनता पक्षाचे असो प्रदेश भाजपा चे नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत दादा पाटील यांची असून ओबीसी समाजाच्या पाठीशी भारतीय जनता पक्ष समर्थपणे उभा आहे
असेही जिल्हा भाजपाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी समोर आजचा निकाल ही सरकार पूर्णपणे अपयश आहे व यावरून सरकारची नीति कृती सिद्ध होत असल्याचाही त्यांनी सांगितले
0 टिप्पण्या