Ticker

6/recent/ticker-posts

डाॅ.नितीन राऊतांच्या उपचारासाठी वंचित ने मानसोपचार करण्यासाठी केली नोंदनी

डाॅ.नितीन राऊतांच्या उपचारासाठी वंचित ने मानसोपचार करण्यासाठी केली नोंदनी



डाॅ.नितीन राऊतांच्या उपचारासाठी डॉ दीपक केळकर ह्यांचे कडे वंचित बहुजन युवा आघाडी च्या वतीने मानसोपचार करण्यासाठी ओपीडी मध्ये नोंद करण्यात आली आहे. पावती क्रमांक 7345 नुसार नितीन राऊत नागपूर ह्यांचे करिता 200 रुपये सचिन शिराळे ह्यांनी धम्मदान दिले आहेत.



उपचाराला पैसे कमी पडू देणार नाही, असा संकल्प युवा आघाडीच्या वतीने आज महाशिवरात्रीच्या दिवशी करण्यात आला.  नितीन राऊत मानसोपचार सहाय्य निधीची उभारणी करून त्यासाठी प्रत्येकी 10 पैसे गोळा करण्याची मोहिम सुरू करणार असल्याचे कळविले आहे. कुणीही भावनिक होऊन 10 पैश्या पेक्षा जास्त पैसे जमा करू नये.असे भावनिक आवाहन यावेळी करण्यात आले आहे. "दुरुस्त करके ही मानेंगे" असा मानस ठेऊनच ही संकल्पना घेतली आहे. कुणी तरी खांग्रेसी मंत्र्यांना निरोप द्यावा, असे आवाहन युवा वंचित बहुजन आघाडीने केले आहे, यासाठी आम्ही तयार आहोत. असे मा. राजेंद्र पातोडे यांनी कळविले आहे.



अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या