पक्ष बळकट करण्यासाठी पक्ष कार्यालय असणे गरजेचे ; अॅड. प्रकाश आंबेडकर
वंचित बहुजन महिला आघाडीच्या महानगर कार्यालयाचे उद्घाटन
अकोला : राजकीय पक्षाला बळकट करण्यासाठी सुरुवातीला पक्ष कार्यालय असणे गरजेचे असुन महिला आघाडीने महानगर कार्यालय सुरु केले ते अभिनंदनीय बाब असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. वंचित बहुजन महिला आघाडीच्या महानगर कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी कार्यक्रमात बोलत ते होते.
या पक्ष कार्यालय उद्घाटन प्रसंगी वंचित बहुजन महिला आघाडीच्या नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्यासह अरुंधतीताई शिरसाट, महानगर अध्यक्ष सौ. वंदनाताई वासनिक, वंचित चे अकोला पुर्व चे शंकरराव इंगळे, जिल्हाध्यक्ष प्रभाताई शिरसाट,जि प अध्यक्ष प्रतिभाताई भोजने, जि प उपाध्यक्ष सावित्रीताई राठोड, शोभाताई शेळके,जि प सदस्य पुष्पाताई इंगळे, प्रतिभाताई अवचार,
प्रा.मंतोषताई मोहोळ, सुवर्णा जाधव, किरण बोराखडे,सरला मेश्राम, पार्वती लहाने, संगिता खंडारे, सुनिता गजघाटे, मेघा शिराळे, गिताताई गवई, सुनंदा चांदणे, छाया गवई, प्रतिभा नागदेवते, शुभांगी सोनोने, माया इंगळे, कल्पना महल्ले, संगिता रायबोले यांच्यासह वंचित बहुजन महिला आघाडीच्या महानगरातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या