बार असो.च्या अध्यक्षपदासाठी एड.शेखानी मैदानात
अकोला-1155 विधिज्ञ सदस्य असलेल्या अकोला बार असो.ची निवडणूक ही आगामी दिनांक 11 फेब्रुवारी रोजी होत आहे.अध्यक्ष,उपाध्यक्ष,महिला उपाध्यक्ष व सहसचिव पदासाठी होणाऱ्या या निवडणुकीत तब्बल 12 उमेदवार निवडणुक रिंगणात असून चुरस सुरू झाली आहे.या निवडणुकीतून अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ही 7 फेब्रुवारी असून निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जेष्ठ विधिज्ञ एड उदय नाईक कामकाज बघत आहे.या निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी दोन उमेदवार निवडणुकीच्या मैदानात असून यात एड मो.इलयास शेखानी यांनीही अध्यक्ष पदासाठी आपली उमेदवारी जाहीर केली असून शुक्रवारी आपला अर्ज त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी एड उदय नाईक यांच्याकडे आपल्या समर्थकासह सुपूर्द केला आहे.या निवडणुकीत उपाध्यक्ष पदासाठी दोन,महिला उपाध्यक्षसाठी तीन व सहसचिव पदासाठी चार उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.बार व संघटनच्या कामाचा दांडगा अनुभव एड शेखानी यांच्याकडे असून या निवडणुकीत नवे समीकरण निर्माण करण्यासाठी सर्व उमेदवार प्रयत्न करीत आहेत.
0 टिप्पण्या