शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा....
१०५ गडदुर्ग सर करून दिली अणोखी मानवंदना
*उन्नती नगर, कौलखेड येथील श्री. संतोष पुरी व सौ. अश्र्विनी पुरी यांचे निवासस्थानी शिवजन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. श्री.संतोष पुरी सर हे ईंग्लिश हायस्कूल, अकोला येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना शिवरायांचा पराक्रम व गडदुर्गां बद्दल फार निष्ठा आहे पुरी सर यांनी आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १०५ गडदुर्गांची अभ्यासपूर्ण सफर केलेली आहे. त्यापैकी ७३ किल्ल्यावरची छ. शिवराय व छ. संभाजी राजे यांच्या पावन स्पर्शाने पावन झालेली माती संग्रहीत करून आज त्या पवित्र मातीचे पूजन करण्यात आले.कु. धनश्री पुरी, कु. यशश्री पुरी, कु.शरयू राऊत, कु. ईश्वरी जाधव व कु. धनश्री राऊत यांनी याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंगांवर भाषणे, पाळणा गीत, कवीभूषण यांचे काव्य सादर केले.
यावेळी अखिल भारतीय योग शिक्षक संघाचे राज्य सिचिव व आस्था योग फाऊंडेशन चे सर्वेसर्वा आ. अवचार सर व सर्व साधक, डॉ. राजेश भोंडे,शिवछत्रपती सायकलिंग ग्रुपचे संस्थापक आ. लाहोळे सर, हिंदवी परिवाराचे सदस्य,ईंग्लिश हायस्कूल चे मुख्याध्यापक आ. राजपूत सर व संन्मित्र पब्लिक स्कूल च्या प्राचार्या सौ. राजपूत तसेच आ. राजकुमार तडस,विश्वकर्मा महिला विकास संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती जयमाला खेडकर, आ.ऊध्दवजी धाडे, आ.विनोद इंगोले, हेमंत पद्मने,सुनील नायसे,शंतनू वक्ते,संदिप,न्रुपनारायण,दिवनाले,राजु नकासकर,सुरेश इढोळे आदी योग साधक व साधीका तसेच उन्नती नगरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवमय झालेल्या पुरी परिवाराचे या प्रसंगी सर्वांनी कौतुक व अभिनंदन केले.
🛕🛕🛕🛕🛕🛕🛕
0 टिप्पण्या