Ticker

6/recent/ticker-posts

अकोला तालुका क्रीडा संकुला करिता जागा उपलब्ध होण्यासाठी क्रीडा संकुल समितीची बैठक

अकोला तालुका क्रीडा संकुला करिता जागा उपलब्ध होण्यासाठी  क्रीडा संकुल समितीची बैठक


अकोला
अकोला तालुका क्रीडा संकुला करिता जागा उपलब्ध करून देऊन  तातडीने  उभारणी करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे कार्यालयात आमदार रणधीर सावरकर,अध्यक्ष तालुका क्रीडा संकुल समिती यांनी बैठक घेऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या. 


अकोला जिल्ह्यात क्रीडा क्षेत्राला उभारी देऊन नामवंत खेळाडू तयार व्हावेत या करिता सर्वसोय युक्त तालुका क्रीडा संकुलाची उभारणी करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी याचे कार्यालयात सर्व संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यासमोर आ सावरकर यांनी बैठक आयोजित केली होती. अकोला जिल्ह्याने उज्वल क्रीडा संस्कृतीचा सतत परिचय देऊन जिल्ह्यातून अनेक राष्ट्रीय व अंतर राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण केले आहेत. आ. रणधीर सावरकर यांचे हस्ते  जिल्ह्यातील बॉक्सिंग क्षेत्रात राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केलेल्या विजयी झालेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. जिल्ह्यातील कु. पलक झामरे हिची बॉक्सिंग स्पर्धेसाठी आगामी सराबिया व जोर्डेन येथे होणाऱ्या चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. हरिवंश टावरी अंतर राष्ट्रीय खेळाडू याची इंडोनेशिया स्पर्धे साठी निवड, कु. दिया बचे गोल्ड बेस्ट बॉक्सर, कु. रेवती उंबरकर महाराष्ट्र स्वर्ण पदक विजेती, मोहम्मद राहिल ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी पदक विजेता नाना पिसाळ स्कूल नॅशनल सिल्व्हर मेडल विजेता या नामवंत खेळाडूंचा  आमदार सावरकर यांनी सत्कार करून पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या. 


जिल्ह्यातील विद्यार्थी खेळाडू व क्रीडा प्रेमी यांना क्रीडा क्षेत्रात करीयर करण्यासाठी क्रीडा संकुलांची गरज पूर्ण करण्यासाठी तालुका क्रीडा संकुल उभारणीसाठी गती देण्यात यावी अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या.  अकोला तालुका क्रीडा संकुलाच्या जागा उपलब्धतेचा प्रस्ताव दीर्घकाळापासून मंजुरीच्या प्रतीक्षेत होता. अकोला तालुका क्रीडा संकुल बांधकामासाठी कुंभारी ते बाभूळगाव मार्गावरील ( ता. अकोला) कुंभारी गावातील शासकीय जमीन असलेल्या गट क्रमांक २०० मधील सुमारे ५ एकर जमीन सदरच्या क्रीडा संकुलासाठी अत्यंत उपयुक्त असल्याची खात्री करण्यात आली असून सदरची जमीन राष्ट्रीय महामार्गापासून १ कि.मी. अंतरावर, एमआयडीसी परीसरालगत आहे. सदर जागेच्या नजीकच्या परीसरानाजिक  उदा.बाभूळगाव, कुंभारी, शिवणी, शिवर, डोंगरगाव इत्यादी क्षेत्रात अनेक शैक्षणिक संस्था असल्याने स्वाभाविकच  शैक्षणिक संस्थांच्या विद्यार्थ्यांनासुद्धा  शारीरिक शिक्षणाचा सुद्धा लाभ उपलब्ध होणार आहे. सदर जागा तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधित शासकीय कार्यालयांकडून ना हरकत प्रमाणपत्र मागविण्यात आलेले आहेत. सदर बैठकीस  तुकाराम बिडकर माजी आमदार तथा माजी अध्यक्ष विदर्भ वैधानिक विकास मंडळ, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, सुनील पाटील, तहसीलदार, कुलकर्णी तालुका क्रीडा अधिकारी, श्रीमती ठाकरे, क्रीडा अधिकारी ,वन विभागाचे पडगव्ह्नन,भूमिअभिलेख विभागाचे विनोद जाधव, पाटबंधारे विभागाचे सचिन वनारे, प्रदूषण महामंडळाचे नंदकिशोर पाटील तसेच महानगर पालिका नगर रचना, जिल्हा निबंधक खरेदी विक्री विभागाचे व आदी अधिकारी उपस्थित होते.



अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या