Ticker

6/recent/ticker-posts

अकोला पंचायत समिती उपसभापती पदासाठी आनंद संपत डोंगरे यांची बिनविरोध निवड

अकोला पंचायत समिती उपसभापती पदासाठी आनंद संपत डोंगरे यांची बिनविरोध निवड


अकोला:- श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने अकोला पंचायत समिती उपसभापती पदासाठी आज सभागृहात निवडणूक घेण्यात आली वंचित बहुजन आघाडी कडून अकोला पंचायत समिति उपसभापती पदासाठी आनंद संपत डोंगरे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध उपसभापती म्हणून निवड झाली.   वंचित मध्ये यावेळी या एका जागा साठी व्यूहरचना आखली गेली होती. त्यामुळे अकोला पंचायत समिती सर्कल म्हैसांग गण मधील व मजलापुर दापुरा या गावचे रहिवासी आनंद संपत डोंगरे यांची अविरोध पंचायत समिती उपसभापती पदाची निवडणुकीत निवड झाली आहे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनात काम करत असताना खंदे समर्थक म्हणून आनंद डोंगरे यांचे नाव आहे. 


आज सकाळी अकरा वाजता पंचायत समिती सभागृहां मध्ये विशेष सभेमध्ये मतदान घेण्याचे ठरवले यामध्ये उपसभापती पदासाठी नामनिर्देशन आनंद डोंगरे यांचे एकमेव आल्याने आनंद डोंगरे यांना अविरोध म्हणून अकोला पंचायत समिती उपसभापती निवड करण्यात आली आहे त्यांच्या निवडीचे श्रेय श्रद्धेय एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांना देऊन त्यांनी वंचित मधील सर्व पदाधिकाऱ्यांचे यावेळी आभार मानले. निवडणूक प्रक्रिया निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार सुनील पाटील यांनी पाहिली तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून राहुल शेळके गट विकास अधिकारी पंचायत समिती अकोला यांनी कामकाज पाहिले.


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या