Ticker

6/recent/ticker-posts

६ डिसेंबर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६५ वा."महापरिनिर्वाण-दिन"निमित्त, भगवान रविदास कम्युनिटीज फेडरेशन(BRCF)विदर्भ विभाग अकोला चे वतीने भवपूर्ण-आदरांजली व अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न !!!

६ डिसेंबर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६५ वा."महापरिनिर्वाण-दिन"निमित्त, भगवान रविदास कम्युनिटीज फेडरेशन(BRCF)विदर्भ विभाग अकोला चे वतीने भवपूर्ण-आदरांजली व अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न !!!         



🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺                                                       अकोला :-- दि.६ डिसेंबर रोजी ठीक सायं.५.३० वा. BRCF अर्थात भगवान रविदास कम्युनिटीज फ़ेडरेशन विदर्भ विभाग,अकोला चे वतीने शहरातील तोषनिवाल ले आउट येथील इन्फिनिटी कोचिंग क्लास च्यां हॉल मध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री मेघश्याम ठोसरे साहेब होते.त्यांचे हस्ते विश्वरत्न, भारतरत्न घटनाकार डॉ. बाबासाहेब यांचें प्रतिमे पूजन करण्यात आले फुले अर्पण करून पुष्पहार घालून "महापरिनिर्वाण-दिन"निमित्त मनःपूर्वक आदरांजली व अभिवादन करण्यात आले.


नंतर समाजातील मान्य. वक्त्यांची भाषणं झालित वक्ते श्री रामभाऊ ताजने,श्री श्रीराम राखोंडे,श्री पांडुरंग वाडेकर, श्री प्रल्हाद शेगोकार,श्री शेषराव वाडेकर,श्री मधुकर वानेडकर श्री मेघश्याम ठोसरे(अध्यक्ष)इत्यादी वक्त्यांनी डॉ. बाबासाहेब हे आधुनिक भारताचे खरे शिल्पकार होत व त्यांनीच हिन्दू-कोड बिल देऊन संपूर्ण भारतीय स्त्रिचा उद्धार केला व माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला.संपूर्ण भारतीय नागरिकांवर त्यांनी उपकार ठेवलेत ते खरे देशाचे नेता होते अशा प्रकारे सर्वानीच आपले मनोगत व्यक्त केलेत.कार्यक्रमात समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते जसे श्री लक्ष्मणराव पदमने,श्री महादेवराव कळसकर,श्री सारंगधर डाखोडे, श्री आत्माराम भटकर,श्री सहेबराव डोंगरे,श्री निरंजन गव्हाळे,श्री नरहरी राजगुरू,श्री महादेव इंगळे,श्री ओंकार धुमाळे,श्री गजानन वाडेकर,श्री ओंकार चिमनकर,श्री देविदास खंडारे,श्री नितिन ठोसर,श्री महादेव गवई,श्री  महादेव शेगोकार,इत्यादी बांधव हजर होते,सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ गजानन डोईफोडे सर यांनी केले आणि आभार प्रदर्शन श्री विष्णु वाडेकर गुरुजी यांनी केले.                            
जयगुरूरविदास-जयभिम🙏🙏                                          🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻                                                                    ===================


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या