विदर्भ माझा पार्टी मनपा निवडणुकीसाठी सज्ज ,आज पक्ष कार्यालयात पार पडली बैठक
अकोला - जिल्हाध्यक्ष अजाबराव ताले यांच्या अध्यक्षतेखाली आज महासचिव राहुल जाधव , संतोष ठाकूर ,संजय पाठक , ,रवी बकाल, संघपाल सिरसाट ,संजय झाडोकार,संतोष ठाकूर ,मुरलीधर सटाले ,गोवर्धन वाघाडे, दीपक साहू ,भिकाजी अहिर, पुष्पाताई डाळे, शनैश्वर विसपुते, करणी सेना अध्यक्ष संतोष ठाकूर , ईसमाईल ठेकेदार, अजहर खान पठाण, आदी प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत अकोला मनपा निवडणूकसाठी संपूर्ण तयारी नियोजन करणे निमित्ताने चारही झोनमध्ये उमेदवार चाचपणी आणि उमेदवार निवडसाठी जबाबदार वॉर्ड निहाय 2 पदाधिकारी नियुक्त करणे तसेच महिलांना 50 टक्के उमेदवारी देणे सह इतर आवश्यक बाबींचा विचार करून येत्या मनपा निवडणूक मध्ये सर्वच्या सर्व जागेवर उमेदवार उभे करून जास्तीतजास्त उमेदवारांना विजयी करण्यासाठी नियोजन करण्यात आले येत्या मनपा निवडणूकमध्ये मनपामध्ये सत्ताधारी भाजपावर जनतेची नाराजी तर राज्याच्या सत्तेत असलेल्या काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नाराज जनतेला सक्षम पर्याय म्हणून विदर्भ माझा पार्टी हा पर्याय देण्यासाठी महिलांना 50 टक्के उमेदवारी कशी देता येईल याची खबरदारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कसे नियोजन करावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले
0 टिप्पण्या