रिसोड येथील जखमींना मिळाली आर्थिक मदत
अपराध क्र. ७९७/२१ फिर्यादी श्री. रामभाऊ सखाराम पारवे जात मातंग रा. लोणी खु. ता. रिसोड, जि. वाशिम अन्वये दाखल प्रकरणावावत अहवाल.
उपरोक्त विषयाचे अनुषंगाने सविनय सादर करण्यात येते की, अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ अंतर्गत पोलिस स्टेशन रिसोड, जि. वाशिम येथे फिर्यादी नामे रामभाऊ सखाराम पारवे वय ७० वर्षे जात मातंग, रा. लोणी खु. ता. रिसोड, जि. वाशिम यांचे रिपोर्ट वरुन अपराध क्र. ७९७ / २१, दि. २२/११/२०२१ भा. द. वि. कलम ३०७, ३४९, ४५४, १४३, १४७, १४८, १४९, ५०४,५०६ सहकलम ३ (i) (r) (s), ३ (२) (va) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटनेच्या अनुषंगाने दि. २२/११/२०२९ रोजी ग्राम लोणी खु. ता. रिसोड गावामध्ये घटनास्थळी जावून भेट दिली तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय, वाशिम येथे उपचाराकरीता भरती असलेल्या जखमी व्यक्तींची भेट घेवून विचारपूस केली.
सदर घटनेची हकीकत अशी की, मागील ६ महिन्यापूर्वी मातंग समाजातील लोकांनी गावातील मारोती मंदीराच्या समोरील सरकारी जागेत वस्ताद लहूजी साळवे यांचा बोर्ड लावला तेव्हा पासून गावातील सवर्ण समाजाचे लोक बाद घालत होते असे समजले. दि. २०/११/२०२९ रोजी सायंकाळी ६.३० वाजता चे सुमारास जिल्हा परिषद शाळेसमोर ज्ञानदेव पारवे, रामभाऊ पारवे, कैलास गणपत साठे मोटर सायकल घेवून येत असतांना, मांगट्या हो तुम्ही मारोती मंदिरासमोर लहूजी साळवे यांचा बोर्ड का लावला तुम्हाला लय माज चढला आहे असे म्हणून आरोपींना हातातील कु-हाडीने ज्ञानदेव रामभाऊ पारवे यांच्या डोक्यात मारले, हातातील लोखंडी काठीने कैलास गणपत साठे यांचे दोन्ही पायावर व कमरेवर मारहाण केली तसेच पाठलाग करुन तुम्हाला आज जिवाने मारून टाकू अशा धमक्या देवून शिवीगाळ केली व गल्लीत येवून घरात घुसले व त्यांच्या हातातील कु-हाडीने ज्ञानेश्वर सुखदेव पारवे, शिवाजी रमेश साठे, छाया कैलास साठे, सुखदेव भानुदास पारवं, नेहा विलास साठे, रमेश गणपत साठे यांना जिवाने मारण्याचे उद्देशाने मारहाण केली.
गुन्ह्यामध्ये स्वरूप व गांभीर्य विचारात घेवून गंभीर जखमी होवून दवाखान्यामध्ये उपचार घेत असलेले १) श्री. रामभाउ सखाराम पारवे २) श्री. ज्ञानदेव रामभाऊ पारवे ३) श्री. कैलास गणपत साठे ४) श्री. ज्ञानेश्वर सुखदेव पारवे ५) श्री. शिवाजी रमेश साठे ६) श्री. सुखदेव भानुदास पार यांना प्रत्येकी रु. १,००,०००/- तातडीचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे तसेच (१) छाया फैलास साठे २) नेहा बिलास साठे ३) श्री. रमेश गणपत साठे यांना प्रत्येकी रु. ५०,०००/ तातडीचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. सदर प्रकरणामध्ये ९ पिढीत व्यक्तींना एकूण ७,५०,०००/- तातडीने अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले असून संबंधितांना अर्थसहाय्याची रक्कम अदा करण्याची कार्यवाही सुरु आहे.
करीता माहितीस्तव अहवाल सविनय सादर.
आपला विश्वासू
(मारोती बाठ) सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, वाशिम
0 टिप्पण्या