Ticker

6/recent/ticker-posts

संत गाडगेबाबाच्या ६५ व्या पुण्यतिथीला ७२ निराधार गरजुंना साडीचोळी ब्लॅकेटचे वाटप

संत गाडगेबाबाच्या ६५ व्या पुण्यतिथीला ७२  निराधार गरजुंना साडीचोळी ब्लॅकेटचे वाटप


हजारो भावीकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ..

 हिवरखेड येथे दरवर्षीप्रमाणे संत गाडगेबाबा मंदिर येथे समाजातील वंचित, निराधार गरजवंताना संतगाडगेबाबा सेवा समितीचे वतीने संत गाडगेबाबा पुण्यतिथीला  व संतरुपलाल महाराज यांचे मंदिराच्या भूमीपुजन प्रसंगी हभप श्री.नेमाडे महाराज, गावच्या संरपच सिमाताई राऊत, माजी सरपंच प्रतिभाताई येऊल, सामाजिक कार्यकर्त्या ऊज्वलाताई नेरकर यांचे हस्ते साडी- चोळी व ब्लॅकेटचे वितरण करण्यात आले. यावेळी उपस्थित पाहुण्याचे हस्ते संत गाडगेबाबा मूर्तिपूजन केल्यानंतर यजमान सौ. सिमाताई  व संतोष राऊत यांनी सपत्निक पुजन करुन संत गाडगेबाबा यांचे गुरुशिष्य नाते असलेले संत रुपलाल महाराज यांचे मंदिराचे भूमिपुजन गाडगेबाबाचे भक्त वासूदेव वाघ यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी नशामूक्ती अभियान जयगूरुदेव नाम प्रभूका हा सत्संग हभप रमेश महाराज माहोकार यांनी सादर केला. यावेळी वासुदेव पोके, अभियंता सुरेश नाठे, रामराव हागे, प्रवीण येऊल,ओरीवकर,फौजि रमेश रेखाते,प्रमोद पोके गुरुजी हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सचांलन पोके गुरुजी यांनी केले.तसेच छायाताई नंदकिशोर कौसकार यांचे निवास्थानी संतगाडगेबाबा पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी श्री विठ्ठल मंदिराचे ट्रस्टी सत्यदेव गिऱ्हे, शकंरराव देशमुख, नागापुरे गुरुजी, यांच्यासह उपस्थितांनी संत गाडगेबाबा प्रतीमेचे पुजन केले.यावेळी हिवरखेड उपसरपंच रमेश दुतोंडे, पत्रकार श्यामशिल भोपळे, संदीप इंगळे, संतोषकुमार राऊत, मनिष भुडके,सुरज चौबे, पोलीस पाटील प्रकाश गांवडे,डाॅ राम तिडके यांच्या हस्ते साडीचौळी व ब्लॅकेटचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी नंदकीशोर कौसकार यांचे निवासस्थानी आयोजित   महाप्रसादाला हजारो भाविकांनी लाभ घेतला. संतगाडगेबाबा सेवासमितीच्या वतीने  बाळासाहेब नेरकर निराश्रिताना कपडे वाटपाचा कार्यक्रम चौदा वर्षापासुन राबवत आहेत,त्याबद्दल त्यांना ग्रामस्थांकडून गौरविण्यात आले.

अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या