संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीचे निमित्त साधून जय संताजी महिला मंडळाच्या वतीने उत्सव
अकोला महाराष्ट्र ही संतांची भूमी असून अध्यात्म व वारकरी संप्रदायाला समृद्ध करणारे तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर एकनाथ सावता माळी, यांची परंपरा संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची तुकाराम गाथा व साहित्य आपल्या सिद्धहस्त लेखणीतून पुन्हा लिहून उपलब्ध करून देणारे व समाजाला मार्गदर्शन व प्रबोधन करणाऱ्या संत शिरोमणी जगनाडे महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत कार्य करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन डॉक्टर अंजली अरूलकर यांनी केले. संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीचे निमित्त साधून जय संताजी महिला मंडळाच्या वतीने 8 डिसेंबर रोजी राठोड पंच बंगला जुने शहर येथे महाराजांची जयंती उत्सव जगनाडे महाराजांना वंदन करून, मूर्तीला माल्यार्पण करून उत्सव साजरा करण्यात आला.
कर्यक्रमचे प्रास्ताविक व परिचय सौ पुष्पा वानखडे ने केले आभारप्रदर्शन कल्पना अडचूलेनी केले, मंचावर डॉ अंजली अरुळकार, सौ अनिताताई भिरड, सौ शशिकलाताई झापर्डे, सौ उषाताई गोतमारे उपस्थित होत्या.ड्रॉ अंजली यांनी सर्व उपस्थितांना महिला व बाल आरोग्या विषयी मार्गदर्शन केले व कु प्रेरणा हिने कुस्तीत युनिव्हर्सिटी कलर कोड मिळवल्या बद्दल तिचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच कु. आर्या जुमले नी संताजी महाराजांची माहिती सांगितली
कार्यक्रम यशस्वीरित्यापार पडण्या करीता सौ राजेश्री गोतमारे,सुनिताताई उकर्डे,अनिता चाटी, भाग्यश्री ढवळे,हर्षा मेहेसरे,रेखा नालट, लीना वानखडे, गायत्री जुमळे, सुलभा चाटी,वर्षा अकोटकार, जया ढवळे, कमलाबाई निवाने, वंदना गमे, पुष्पाताई गोतमारे, दीपा निवाने, शारदा वानखडे संतोषी निवाने, कल्पना अडचुले, ललिता बोराडे,आशा अरूळकार, मीरा बोरे,इंदिरा अडचुले, ललिता बोराळे, मीरा बोरे, वैशाली अकोटकार, अनिता भिरड, कमलबाई भोंबळे, रश्मी अवचार, अनुराधा ईचे,देवकाबाई बुलबुले, सुनंदा झापर्डे, प्रमिला चोपडे,सुनंदा चोपडे, चंचल सांगे,वैशाली सांगे, लक्ष्मी सांगे वैष्णवी सांगे साक्षी सांगे,आरती वासनकार हा दिनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या