Ticker

6/recent/ticker-posts

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या 72 व्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या 72 व्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन


अकोला 
 कष्टकरी व सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देणारे संघर्षशील नेतृत्व व घरोघरी भारतीय जनता पक्षाला पोहोचवणारे गोपीनाथ मुंडे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांचे विचार त्याचा संघर्ष त्याग तपस्या पक्षाविषयीतळमळ कार्यकर्त्यांनी लक्षात घेऊन कार्य करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी केले.


स्थानिक भाजपा कार्यालयात लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या 72 व्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल हे होते ‌. तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार गोवर्धन शर्मा, महापौर अर्चनाताई मसने, तेजराव थोरात माधव मानकर अक्षय गंगाखेडकर संजय गोडफोडे, श्रीकृष्ण मोरखडे अंबादास उमाळे गणेश अंधारे, निलेश निनो रे अमोल गोगे प्रवीण हगवणे पाटील अभिजीत बांगर उमेश गुजर, संतोष पांडे, एडवोकेट देवाशीष काकड, अमोल गीते धनंजय धमाले राजेंद्र गिरी संजय बडवणे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा सहवास व त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकले. आमदार गोवर्धन शर्मा यांनी आपल्याला आलेले अनुभव व कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहणारे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी पक्षाचा विस्तार केला त्यांचे साथीदार भाऊसाहेब फुंडकर यांच्या जोडीने पक्षाचा घरोघरी विस्तार करून समाजातील सर्व घटकांना एकत्रित केले. विचार आचरण हे प्रेरणादायी असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गिरीश जोशी तर संचालन राजेश बेले तर आभार प्रदर्शन डॉक्टर शंकरराव वाकुडे यांनी केले


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या