अनाथांचा नाथ सामाजिक कार्यकर्ता सनी मुदुंगे....!
प्रतिनिधी योगेश शिरसाट
दिनांक 20 नोव्हेंबर 2021
अकोला:-सामाजिक बांधीलकी जपून व महिला कॉन्स्टेबल पोलीस यांच्या विनंती वरून रुग्णसेवक सनी मुदूंगे यांनी रोहित शिरसाट, अमित मोरे, अवि मराठे, मयूर गुजर यांनी पार पडला बेवारस प्रेताचा अत्यं विधी अनाथांचा नाथ म्हणून सामाजिक कार्यकर्ता सनी मुदुंगे आणि मित्रमंडळी यांच्या मदतीने केला.
शासकीय सर्वोपचार रुग्णालय,अकोला अपघात कक्षा मधील उपचारार्थ करीता अनोळखी इसमाने भरती केले होते उपचार करत असताना दरम्यान ती व्यक्ती दि 17 नोव्हेंबर 2021 रोजी 1:50 वाजता मरण पावली.
त्यामुळे पोलिसांनी आकस्मित मृत्यू क्रमांक 173 / 2021 तयार करून दाखल केले तसेच पुढील तपास घेण्यात आला तेव्हा सदर अनोळखी व्यक्तीशी मृत्यू देहाची ओळख पटलेली नसून सदर प्रेताचा अत्यं विधी,आज दिनांक 20 नोव्हेंबर 2021 रोजी शनिवार मृत प्रेताची माहितीं महिला कॉन्स्टेबल मीना सोळंके यांनी सामाजिक कार्यकर्ते तथा रूग्णसेवक सनी मुदूंगे यांना दिली त्यानंतर सनी मुदूंगे यांच्या सहकार्याने व मित्रमंडळी रोहित शिरसाट, अमित मोरे, अवि मराठे, मयूर गुजर यांच्या सर्वांच्या समक्ष बेवारस मृतदेह प्रेताचा अत्यं विधी स्मशान भूमीत मोहता स्मशान भूमी चे संचालक दीपक शिंदे आणि महिला कॉन्स्टेबल मीना सोळके यांच्या उपस्थितीत स्मशानभूमीत पार पडण्यात आला. असा अनाथां चा नाथ सनी मृदंगे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली त्यांच्या या कार्याने सर्वत्र असे कार्यकर्ते निर्माण व्हावे जेणेकरून सामाजिक बंधने निर्माण होतील
0 टिप्पण्या