Ticker

6/recent/ticker-posts

अकोला नळ पाणीपुरवठा दोन दिवस राहणार बंद

अकोला नळ पाणीपुरवठा दोन दिवस राहणार बंद


महान येथील जलशुद्धीकरण केंद्रांतील ६५ एमएलडी प्लान्टमध्ये व्हॉल्व्ह बसविण्याच्या कामाला प्रारंभ केला जाणार असल्याने १ व २ डिसेंबर रोजी जुने शहर वगळता शहरातील काही भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. यामुळे नागरिकांनी पाण्याचे साठवण करण्याचे आवाहन मनपाच्या जलप्रदाय विभागाने केले आहे.


केंद्र शासन पुरस्कृत अभियान अंतर्गत महान येथील जलशुद्धीकरण केंद्रातील ६५ एमएलडी प्लान्टमध्ये नवीन व्हॉल्व्ह बसविला जाणार आहे. यामुळे ९०० मिमी व्यासाच्या पाइपलाइनद्वारे होणारा नवीन शहराचा पाणीपुरवठा १ व २ डिसेंबर रोजी बंद ठेवला जाणार आहे. यादरम्यान, जलशुद्धीकरण केंद्रातील २५ एमएलडी प्लान्टमधून ६०० मिमी व्यासाच्या पाइपलाइनद्वारे जुने शहरातील शिवनगर व बसस्टैंड मागील जलकुंभावरून होणारा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यात येईल.


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या