परिचय मेळावा आयोजन ही काळाची गरज —आमदार रणधीर सावरकर
अकोला जिल्हा मराठा मंडळ व पाटील बहुउद्देशीय सेवा समितीच्या राज्यस्तरीय मेळाव्यास उत्स्फृत प्रतिसाद
——————————————
अकोला—सोयरिक संबंध जुळविणे ही समाजासमोरील अत्यंत जटील समस्या बनली आहे.अशापरिस्थितीत उपवर युवक युवती परिचय मेळाव्याचे आयोजन करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार रणधीर सावरकर यांनी केले.
अकोला जिल्हा मराठा मंडळ व पाटील बहुउद्देशीय सेवा समितीचे वतीने मराठा मंडळ रामदासपेठ येथे आयोजित राज्यस्तरीय युवक युवती परिचय मेळाव्याचे उद् घाटनप्रसंगी बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाटील बहुउद्देशीय सेवा समितीचे अध्यक्ष महादेवराव भुईभार होते.आमदार रणधीर सावरकर यांनी सामाजिक भाष्य करतांना मुला मुलींचे सोयरिक जुळवणे ही गुंतागुंतीची समस्या बनली आहे.हा गुंता सोडवण्यासाठी अकोला जिल्हा मराठा मंडळ व पाटील बहुउद्देशीय सेवा समितीचे अनेक वर्षापासुन धडपडत आहेत.ही बाब सामाजिक धृवीकरणासाठी अभिनंदनीय असल्याचे गौरवोद् गार काढले. अनेक वर्षाची परंपरागत चालत आलेलीसोयरिक संबध जुळवणारी व्यवस्था मोडीत निघाल्याने परिचय मेळावा आयोजन एका दिपस्तंभाची भूमिका बजावत आहे.या मेळाव्याला राज्यभरातुन मिळत असलेला उत्स्फृत प्रतिसाद प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन अकोला जिल्हा मराठा मंडळाचे अध्यक्ष डाॅ.रणजीत सपकाळ यांनी केले.
अकोला जिल्हा मराठा मंडळ व पाटील बहुउद्देशीय सेवा समितीच्या संयुक्त विद्यमाने गेल्या २८ वर्षापासुन सातत्याने अशाप्रकारचे परिचय मेळावे आयोजन करीत असल्याची माहिती प्रा.डाॅ.विवेक हिवरे यांनी प्रास्ताविकातुन दिली.अज्ञान,अंधश्रद्धा गाडायला शिका आणि आपल्या मुलामुलींना उच्च शिक्षण द्या,उत्तम शेती करा,व्यसनमुक्तीकडे वाटचाल करा,थकल्याभागल्याना मदतीचा हात द्या,उद्योगाची कास धरा,समाजातील अनिष्ठ प्रथा परंपरांना फाटा देवुन विधायक रुपाने कमीत कमी खर्चाचे लग्नसोहळे आयोजित करण्याचे आवाहन महादेवराव भुईभार यांनी अध्यक्षीय भाषणातुन केले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.राज्यभरातील समाजबांधवांच्या लक्षणीय उपस्थितीने सभागृह खचुन भरले होते. मेळाव्यात उपस्थित उपवर युवक युवतींनी परिचय करुन दिला. दुपारच्या सत्रात समाजातील विधवा,विधुर,घटस्फोटीत ,पूनर्विवाहीतांनी परिचय करुन दिला.एस टी बसेस बंद असतांनाही राज्यभरातील ११०० युवक,युवती,पालकांनी परिचय नोंदणी केली.पुढच्या वर्षी भाऊबीजेच्या दुसर्या दिवशी परिचय मेळाव्याचे आयोजन होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. ज्योती इंगळे यांनी केले.पाटील सेवा समितीचे सचिव श्रीकृष्ण विखे पाटील यांनी आभारप्रदर्शन केले.
अकोला जिल्हा मराठा मंडळाचे उपाध्यक्ष अँड.संजय पाटील,सचिव प्रकाश ज्ञानदेवराव पाटील,कोषाध्यक्ष डाॅ.विनोद बोर्डे,सहसचिव अँड.अभय थोरात,सदस्य शिवाजीराव देशमुख,दिवाकर पाटील,श्रीकांत पागृत,दिपक पाटील आखरे,पाटील बहुउद्देशीय सेवा समितीचे गोपाळराव आखरे,मनोहरराव महल्ले,बबनराव कानकिरड,देविदास कोरपे,सुरेश पागृत,अँड. रामेश्वर खोंड,प्रशांत काळे ,किशोर पाटील,अशोकराव बोंद्रे,प्रा.दिनकर पाटील,महेंद्र पाटील,बजरंग गावंडे,संतोष दांदळे,गजानन डिवरे पाटील,केशवराव मुरुमकार,अनिल पाटील जळगावजामोद ,प्रा.जयश्री बंड,प्रतिभा काटे,गौरी काळे यांचेसह समाजबांधवांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती.
0 टिप्पण्या