Ticker

6/recent/ticker-posts

जिव्हाळा बहुउधयेशीय संस्थेचे विविध क्षेत्रातील कार्य उल्लेखनिय -डॉ अशोक ओळंबे

जिव्हाळा बहुउधयेशीय संस्थेचे विविध क्षेत्रातील कार्य उल्लेखनिय -डॉ अशोक ओळंबे


अकोला:- जिव्हाळा बहुउधयेशीय संस्था अकोला यांनी कोविड संसर्ग काळामध्ये सतत वर्षभर जिल्हा महिला रुग्णालय तसेच जिल्हा रूग्णालय अकोला येथे अन्न दान केले असून सोबतच आवश्यकता असेल तेथे लोकांची भूक भागविली आहे,सोबतच महिलांना रोजगार मिळावा यासाठी विविध शिबिरे घेणे,महिलांच्या विविध समस्यांचे निराकरण करणे त्यामुळे अल्पकाळातच जनतेच्या मनामध्ये आदराचे स्थान निर्माण करून संस्थेच्या अध्यक्षा सौ अलका देशमुख,कार्याध्यक्ष राजाभाऊ देशमुख,सचिव सौ तारताई गोलाईत,गजानन गोलाईत,सौ संगीता मं।गटे,माया चव्हाण यांनी मथुरा वृद्धावन साठी 


वारीचे आयोजन करून ७० महिलांना अल्पदरात देवदर्शनाची सुविधा उपलब्ध करून अध्यात्मिक कार्यात सुध्दा संस्था मागे नाही हे दाखवून दिल्याचे भाजपा नेते डॉ अशोक ओळंबे यांनी सांगितले ते मथुरा वारीसाठी जाणाऱ्या भाविकांना निरोप देण्यासाठी व त्यांचा सत्कार करण्यासाठी रेल्वे स्टेशन अकोला येथे उपस्थित होते,यावेळी संजय चौधरी,गोपाल नागपुरे,किशोर मानकर,सुरेश अंधारे,दिनेश श्रीवास,पोहरे,सचिन काकड,प्रकाश नानकदे,बंडू दाणे,किशोर वडतकर,अरुण मानकर,प्रभाकर वानखडे,आशिष शर्मा,सचिन पाटील सचिन बोरेकर यांची उपस्थिती होती.


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या