Ticker

6/recent/ticker-posts

आज पासून महाविद्यालय सुरु; जिल्हाधिकारी यांचे आदेश

आज पासून महाविद्यालय सुरु; जिल्हाधिकारी यांचे आदेश






अकोला,दि.19(जिमाका)- कोविड-19 चा प्रार्दुभाव व शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अटी व शर्तीचे पालन करुन जिल्ह्यातील  सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्‍वयं अर्थसहाय्यित विद्यापीठे व त्‍यांचे संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग 50 टक्के क्षमतेने बुधवार दि. 20ऑक्‍टोंबर पासून तर वसतीगृहे टप्‍प्‍या-टप्‍प्‍याने सुरु  करण्‍याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहे.


अटि व शर्ती : 18 वर्षावरील विद्यार्थी ज्‍यांनी कोविड-19 च्‍या लसीचे  दोन्‍ही डोस घेतलेले आहेत, तेच विद्यार्थी व विद्यार्थींनी विद्यापीठ व महाविद्यालयात प्रत्‍यक्ष उपस्थित राहू शकतील. ज्‍या विद्यार्थी किंवा विद्यार्थींनीनी कोविड-19 ची लस घेतलेली नाही,  त्‍यांच्‍याकरिता विद्यापीठाने संबंधीत संस्‍थाचे प्रमुख किंवा महाविद्यालयाचे  प्राचार्य यांचे मदतीने स्‍थानिक जिल्‍हा प्रशासनाशी  समन्‍वय साधून लसीकरणासाठी विशेष मोहिम राबवून लसीकरण प्राधान्‍याने पूर्ण करुन घ्‍यावे.  तसेच  विद्यापीठ व महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्‍तर कर्मचाऱ्यांचे देखील लसीकरण प्राधान्‍याने करुन घ्‍यावे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.



अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या