Ticker

6/recent/ticker-posts

*भाजपा पूर्व मंडळाच्यावतीने 100 कोटी लसीकरण पूर्ण झाल्याबद्दल आरोग्य कर्मचारी यांचा सत्कार व लसीकरण लाभार्थ्यांना सन्मान पत्राचे वाटप संपन्न

*भाजपा पूर्व मंडळाच्यावतीने 100 कोटी लसीकरण पूर्ण झाल्याबद्दल आरोग्य कर्मचारी यांचा सत्कार व लसीकरण लाभार्थ्यांना सन्मान पत्राचे वाटप संपन्न*


भारतीय जनता पार्टी पूर्व मंडळाच्या वतीने माजी केंद्रीय मंत्री आदरणीय खासदार संजय धोत्रे ,आ गोवर्धन शर्मा, आ रणधीर सावरकर, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, महापौर अर्चना मसने, ओबीसी आघाडी अध्यक्ष जयंत मसने, युवा नेते व उद्योजक अनुप धोत्रे, जिल्हा सरचिटणीस माधव मानकर, महानगर सरचिटणीस अक्षय गंगाखेडकर, संजय जीरापुरे,डॉ विनोद बोर्डे, संजय गोडा ,संजय गोटफोडे,डॉ किशोर मालोकर, डॉ अभय जैन, डॉ अविनाश पाटील, पूर्व मंडळ अध्यक्ष एडवोकेट देवाशिष काकड यांच्या प्रमुख मार्गदर्शनात पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात 100 जनतेचे लसीकरण पूर्ण झाल्याबद्दल भाजपा पूर्व मंडळाच्यावतीने आरोग्य कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला व लसीकरण लाभार्थी सन्मानपत्र चे वाटपाचा कार्यक्रम विठ्ठल मंदिर,उमरी , आयुर्वेदिक कॉलेज रामनगर, व मनपा शाळा क्र 22 येथील लसीकरण केंद्रात पार पडला


याप्रसंगी आमदार रणधीर सावरकर यांनी लिखित संदेशात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष आभार मानले व सर्व आरोग्य कर्मचारी वृंद यांचे कौतुक केले व लसीकरण करणाऱ्या समस्त जनतेचे अभिनंदन केले आणि शतप्रतिशत लसीकरणाचे उद्दिष्ट समोर ठेऊन कार्य करण्याची सूचना भाजपा पदाधिकारी यांना केली व कोणताही नागरिक हा लसीकरणा पासून वंचित राहू नये याची दक्षता घेण्याचे आवाहन याप्रसंगी आमदार सावरकर यांनी आपल्या लिखित संदेशात केले


भाजपा पूर्व मंडळाच्या वतीने 109 बूथ व 32 शक्तिकेंद्रावर आरोग्य कर्मचारी यांचा सन्मान व लसीकरण लाभार्थी सन्मानपत्र वाटप मोहीम होणार असल्याने आ श्री सावरकर यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांनी अकोला मनपाच्या आरोग्य विभागाचे व सर्व कर्मचारी, डॉक्टर वृंद ,परिचारिका, नगरसेवक, सेवाभावी संस्था, आशा सेविका, करोना योद्धे सफाई दूत यांचे कौतुक केले व सर्व नागरिकांना लसीकरणाचे दोन डोज पूर्ण करण्याचे आवाहन केले,व  आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र भाई मोदी यांचे विशेष अभिनंदन केले



या प्रसंगी उमरी विठ्ठल नगर लसीकरण केंद्रातील डॉ छाया उगले, कविता उईके, एस ए खान, आशा काडकर, पद्मा गोदे, संदीप गावंडे, राजू सपकाळ, आयुर्वेदिक कॉलेज राम नगर येथील डॉ चंद्रकांत धानोकार, ज्योती भौआणी, प्रियांका बोके, पवन  राऊत , मनपा शाळा क्र 22 लसीकरण केंद्रातील सोनल तायडे, शोभा पांडे, कल्पना वंजारे, शेख इमरान समद, सोनल तायडे, सुनीता वारके यांचा प्रमाणपत्र, मास्क, व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला 


या प्रसंगी पूर्व मंडळ सरचिटणीस संदीप गावंडे, आकाश ठाकरे, अभिजित कडू, नगरसेवक  मिलिंद राऊत, सुनीता अग्रवाल,अनिल मुरूमकार,आशिष पवित्रकार,  अनुराधा नावकार, पल्लवी मोरे, रश्मी अवचार, सुभाष खंडारे, संदीप शेगोकार, अनिल मुरूमकार, अमोलजी बोडखे, डॉ श्रीश देशमुख, डॉ राजेंद्रजी नेमाने, डॉ निखाडे, योगेशजी फुसे, निलेशजी काकड, पूर्व मंडळ युवा मोर्चा अध्यक्ष केशवजी हेडा, शिवम ठाकूर, सुशांत तिडके, प्रवीण पोटे,प्रफुल खरात, शुभम चंदन, राहुल खरात व इतर पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन केशव हेडा यांनी केले तर आभार प्रदर्शन संदीपभाऊ शेगोकार यांनी केले


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या