आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये जात-पात धर्म सोडून विकास करण्याचा संकल्प- भाजपा
अकोला
राजकीय सामाजिक धार्मिक विकास करण्याची इच्छा शक्तीच्या बळावर भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते कार्य करत असल्यामुळे समाजातील सुखदुःख सोबत सबका साथ सबका विकास करण्याची व विश्वास संपादन करण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू असल्यामुळे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये जात-पात धर्म सोडून विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाला विजयी करा असे आवाहन जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी केले आमदार सावरकर यांनी आज अकोट तालुका बार्शी टाकळी तालुका या भागात भाजपा उमेदवारांच्या प्रचारात जनसंपर्क अभियानात ते बोलत होते
भाजपा उमेदवार डॉक्टर सुप्रियाताई महल्ले यांच्या प्रचारासाठी त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी छोट्या बैठकी घेऊन ग्रामीण भाषेत संवाद साधून भारिप बहुजन महासंघ शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी यांची कार्यप्रणाली त्यांची वृत्ती व समाजाप्रती भाजपाचा समर्पण सेवा कार्य याचा फरक सांगून भारतीय जनता पक्षाला विजयी करा असे आवाहन केले त्यांच्यासमवेत माधवराव काकड अविनाश पाटील अशोक गावंडे अंबादास उमाळे बाळासाहेब आपोतीकर राजेश बेले राजेश नागमोते माधव मानकर हिरासिंग राठोड रमेश अप्पा खोबरेओमप्रकाश मंत्री प्रल्हाद सोनवणे दिनेश काकड कैलास पाटील गणेश महाले मधुकर पाटील विजय सोळंके मधुकर पाटकरमधुकर पवार दिगंबर रमेश पाटील राजू माले राजू पंढरकर दिगंबर पाटील नारायण पाटील राजू पडळकर सुनील ठाकरे योगेश कोदणकर अनिल गावंडे संजय शिरसाट संजय पाटील दिगंबर गावंडे गणेश पालवे आदी प्रामुख्याने समवेत होते
0 टिप्पण्या