अकोला जिल्ह्यातील अतिवृष्टी ची परिस्थिती लक्षात घेता शेतीचे सर्वे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी
अकोला
अकोला जिल्हा दुष्काळ जाहीर करा. अकोला जिल्ह्यातील अतिवृष्टी ची परिस्थिती लक्षात घेता शेतीचे सर्व करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन यावर्षी घेतलेलं कर्ज त्वरित माफ करावा. ग्रामीण भागात विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करावी. अशी मागणी जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी केली. जिल्हा परिषद सदस्य ओबीसी समाजाचा हक्क महाविकास आघाडी शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीने हिरावून घेतला आहे. अकोला वाशिम नागपूर पालघर नंदुरबार या जिल्ह्यात ओबीसी समाजावर अन्याय झाला आहे. न्यायालयात वकील उपस्थित राहत नाही. काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले महाराष्ट्राच्या शेतकऱ्या विषयी बोलत नाही. संघटनेचा उपयोग शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी करत नाही . मोदी द्वेष हे धोरण घेऊन कार्यरत आहे.
आज शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी केवळ खंडणी टक्केवारी तर जिल्ह्यातील जिल्हा परिषद मध्ये सत्तारूढ पक्ष वंचित आघाडी विशिष्ट व्यक्ती विशिष्ट वर्गाचा कल्याण कल्याण करण्याचा प्रयत्न करीत आहे वंचितांना वंचित ठेवण्याचा प्रताप करून त्यांच्या योजना त्यांच्यापर्यंत न पोहोचू देण्याची वकार करत असल्यामुळे त्यांच्यावर वचक निर्माण करण्यासाठी भारतीय जनता पक्षाला जिल्हा परिषद मध्ये पंचायत समितीमध्ये विजयी करा. असे आव्हान आमदार रणधीर सावरकरांनी केले. भर पावसामध्ये शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी पातुर बाळापुर बार्शिटाकळी या भागात सकाळी सात वाजता पासून आमदार सावरकर शेतकऱ्यांच्या बंधाऱ्यावर जवळ शेतकऱ्यांच्या व्यथा समस्या जाणून घेत आहे. अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. चला धीर देण्याची गरज आहे निवडणूक होत राहणार शेतकरी व ग्रामस्थ जिवंत राहिले पाहिजे त्यांचा विकास झाला पाहिजे त्यांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन आपण जनताजनार्दनाच्या दरबारात सातत्याने फिरत आहोत. निवडणुकीत जय-पराजय अपेक्षा मानवता हा धर्म महत्वाचा आहे शेतकरी हा समाजाचा कणा आहे. त्यांचा भाव भावना व त्यांचे दुःख समजून घेण्यासाठी आपण शेतकऱ्यांच्या दारी आलो आहोत शेतकरी राजा व ग्रामस्थ महत्त्वाचा लोकशाही मधील दान भाजपाच्या कमळ निशाणी बटन दाबून भाजप उमेदवाराला विजयी करणार असा विश्वास आमदार सावरकर यांनी व्यक्त केला आमदार सावरकर यांच्यासमवेत ओबीसी आघाडीचे जयंत मसने माधव मानकर चंद्रकांत अंधारे अनंत बगाडे रेणुका ताई गाडगे मंगेश गाडगे गजानन गाडगे राजू उगले अभिजित गहलोत श्रीकांत बराटे गजानन शेंडे आधी समवेत होते
0 टिप्पण्या