Ticker

6/recent/ticker-posts

सायन्स ओलंपियाड मध्ये निकुंज चौहान अव्वल

सायन्स ओलंपियाड मध्ये निकुंज चौहान अव्वल 


अकोला-बालकांच्या शैक्षणिक कार्यात आंतराष्ट्रीय स्तरावरील सायन्स ऑलिम्पियाड स्पर्धेत स्थानिक कारमेल शाळेचा इयत्ता चौथीचा बाल विद्यार्थी निकुंज प्रकाश चौहान हा शालेयस्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांकाने अव्वल आला.सायन्स ऑलिम्पियाड फाऊंडेशनच्या वतीने सन 2020 -21 साठी घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय मॅथेमॅटिक ओलिंपियाड स्पर्धेत बाल विध्यार्थी निकुंज चौहान सहभागी झाला होता.त्याने आपली उत्तुंग प्रतिभा दाखवत यामध्ये तिसरा क्रमांक प्राप्त करून शाळेचा नावलौकिकही वाढवला आहे. त्याला फाउंडेशनच्या वतीने शाळेत सुवर्ण पदक व प्रशस्तीपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले. आपणास अभियंता होऊन खेळात नैपुण्य दाखवण्याची इच्छा त्याने आपल्या या उपलब्धीवर व्यक्त केली. त्याने आपल्या यशाचे श्रेय आपले वडील प्रकाश चौहान,आई संगीता चौहान,मोठे वडील डॉ. प्रवीण चौहान,डॉ.विवेक चौहान याना दिले. त्याच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या