करोना संकटातील जुलै महिन्यात संपन्न झाले रोटरीचे फिरते नेत्र तपासणी अभियान
अकोला-गत अकरा वर्षांपासून फिरत्या वाहनाद्वारे नेत्र तपासणी करणाऱ्या रोटरीच्या फिरत्या नेत्र तपासणी पथकाच्या वतीने गत जुलै महिन्यात अनेक गावात नेत्र रुग्णांची मोफत तपासणी करून त्यांच्यावर नेत्र उपचार करण्यात आले.रोटरी फिरते नेत्र रुग्णालय,रोटरी क्लब ऑफ अकोला नॉर्थ,आनंदीलाल चिरानिया ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या फिरत्या नेत्र तपासणी वाहनाच्या पथकाने 1जुलै 2021ते 30 जुलै 2021 दरम्यान अनेक गावात नेत्र तपासणी शिबिरे घेऊन नेत्र रुग्णांना औषध साहित्य वितरित केले. या अभियानात म्हैसपुर,वरखेड, कापशी रोड ,चांदुर,शिवापुर, सराळा, गोरवा, विझोरा,कातखेड,आळंदा,रुस्तमबाद,दगड पारवा,काजळेश्वर, उजळेश्वर,महान,हातोला, टेंबा, पुनोती खुर्द, पुनोती बुद्रुक, सपने,लोहगड,धाबा, रेडवा, सुकोंडा, कानडी, सांगवी,अमानतपूर, बादलापूर, कानडी, धोतर्डी, वरोडी, नावखेड,गोनापूर,खरप,घुसर, खोबरखेड, आपोती,आपातापा, कटियार, आकतवाडा,म्हैसांग, करतखेड, सांगवी, मोहाडी,भोड, अहमदपूर, ताकोडा, टाकळी,मांजरी, कंचनपुर,अंत्री, लोणाग्रा, हातरुन,किनखेड,गोपालखेड, नैराट,वैराट, राजापूर,कोरोडी,खानापूर, पांगराबंदी, निंबी आदी गावात नेत्र रुग्णांची मोफत नेत्रतपासणी शिबिरे आयोजित करण्यात येऊन रुग्ण तपासणी करण्यात आली.
.या महिन्यात वरील गावातील या रुग्णांची नेत्रतपासणी करण्यात आली.या मध्ये 573 रुग्णांना चष्मे वितरित करण्यात आलीत तर 28 रुग्णांची नेत्र शस्त्रक्रिया साठी निवड करण्यात आली.निवड झालेल्या मोतीबिंदू असणाऱ्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत.रोटरीच्या फिरत्या नेत्रतपासणी पथकाचे केंद्र प्रमुख डॉ जुगल चिरानिया,डॉ.सुरेश तारे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक प्रज्ञानंद जाधव,रोहित भाकरे,मयूर कुकडे,दत्ता डामरे यांनी कार्य केले रोटरी नॉर्थचे अध्यक्ष देवेंद्र वाघचौरे,सचिव महेश बाहेती यांनी काम बघितले.या वेळी गावांचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी मेहनत घेतली .
0 टिप्पण्या